Diljit Dosanjh : दिलजीत दोसांझच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज ! दिल्ली कॉन्सर्टला पोलिसांची मंजुरी
Diljit Dosanjh Delhi Concert : गायक दिलजीत दोसांजची दिल्ली कॉन्सर्ट पोलिसांनी रद्द केली होती. मात्र आता याबबात मोठी अपडेट समोर आली असून पोलिसांनी अनेक बैठकांनंतर या कॉन्सर्टला परवानगी दिली आहे.

Diljit Dosanjh Delhi Concert : विख्यात गायक दिलजीत दोसांजच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. त्याची ऑक्टोबर एंडला दिल्लीत कॉन्सर्ट होणार होती, त्याला अखेर मंजुरी मिळाली आहे. काही काळापूर्वी दिल्ली पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव या कॉन्सर्टला मंजुरी देण्यान नकार दिला होता. त्यानंचर चाहत्यांमध्ये मोठी खळबळ माजली. मात्र आता पोलिांनी बराच विचार- विमर्श केल्यानंतर या कॉन्सर्टला परवानगी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोजकांसोबत सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर अनेकदा बैठका घेण्यात आल्या. यावेळी आयोजकांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत सविस्तर आराखडा सादर केला. त्यानंतर पोलिसांकडून कॉन्सर्टला परवानगी देण्यात आली.
दरम्यान, BookMyShow नेही स्पष्ट केलं की, कार्यक्रमाची परवानगी रद्द करण्यात आली नव्हती, तर सणासुदीचा काळ लक्षात घेऊन ती काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. IANS च्या वृत्तानुसार, BookMyShow च्या टीमने सांगितलं की, सणासुदीच्या काळात सुरक्षेचा विचार करून दिल्ली पोलिसांनी आयोजकांना सुरक्षा, वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापनासाठी काही अतिरिक्त व्यवस्था करण्यास सांगितलं होतं. त्यामुळे कार्यक्रमाची परवानगी तात्पुरती रोखण्यात आली होती.
BookMyShow Live च्या टीमची दिल्ली पोलिसांसोबत मीटिंग
BookMyShow Live च्या टीमने दिल्ली पोलिसांसोबत बैठक घेतली आणि आवश्यक व्यवस्थांबाबत सविस्तर आराखडा सादर केला. सुरक्षा, वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापनाशी संबंधित सर्व नियमांचं पालन केलं जाईल, असं आश्वासन कंपनीने अधिकाऱ्यांना दिलं. यानंतर कार्यक्रमाच्या परवानगीचा पुन्हा विचार करण्यात आला आणि त्याला मंजुरी देण्यात आली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा कॉन्सर्ट ठरलेल्या वेळापत्रकानुसारच पार पडणार आहे. त्यामुळे चाहत्यांना 30 ऑक्टोबर रोजी दिल्लीत दिलजीत दोसांझच्या लाइव्ह परफॉर्मन्सचा आनंद घेता येणार आहे.
BookMyShow Live की टीम ने दिल्ली पुलिस के साथ बैठक की और जरूरी इंतजामों को लेकर एक विस्तृत योजना पेश की. कंपनी ने अधिकारियों को भरोसा दिलाया कि सुरक्षा, ट्रैफिक और भीड़ को संभालने से जुड़े सभी नियमों का पालन किया जाएगा. इसके बाद कार्यक्रम की अनुमति पर दोबारा विचार किया गया और मंजूरी दे दी गई. कंपनी के मुताबिक, कॉन्सर्ट तय कार्यक्रम के अनुसार ही होगा और फैंस 30 अक्टूबर को दिल्ली में दिलजीत की परफॉर्मेंस का आनंद ले सकेंगे.
कधी कुठे होणार कॉन्सर्ट ?
30 ऑक्टोबर- दिल्ली
15 नोव्हेंबर – इंदौर, C21 इस्टेट
21 नोव्हेंबर- अहमदाबाद, नरेंद्र मोदी स्टेडियम
27 नोव्हेंबर- मुंबई, महालक्ष्मी रेस कोर्स
29 नोव्हेंबर- बंगळुरू, नाइस ग्राउंड
5 नोव्हेंबर- लखनऊ, 19th नॅशनल जंबूरी ग्राउंड
– तारखेची घोषणा नाही – चंडीगढ़, TBA
तिकीटांच्या किमतीबद्दल सांगायचं झालं तर सुरूवातीची किंमत 6,499 असून या कॉन्सर्टचं सर्वात महागडं तिकीट 15,999 रुपयांचं आहे.
