परळी तालुक्यातील कनेरवाडी येथील रहिवासी असलेले माणिक मुंडे हे शेतावर काम करत होते. शेतात पेरणी करून रासनीचे काम सुरु होते. पेरणी झाल्यानंतर रासनीचे काम करत असताना अचानक सायंकाळच्या सुमारास विजेचा कडकडाट सुरु झाला. यावेळी अंगावर वीज कोसळून या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
खरीप हंगामातील पिके ही पावसावरच अवलंबून आहेत. सध्या बरसलेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा असला तरी ही ओल पेरणीसाठी पोषक नाही. दोन दिवसांपूर्वी परळी तालुक्यातील सावरगांव, मांडवा आणि धर्मापूरी या परिसरात पावसाने हजेरी लावलेली आहे. मात्र, हा पाऊस स्थिरावलेला नाही. दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा उघडीप झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घा�
गाडी मागून आली. तिनं समोरून येणाऱ्या दुचाकीला थेट धडक दिली. त्यामुळं दुचाकीवरील दोघांच्या पायाला लागले. गाडी धडकल्यानंतर बॅटनं चेंडूला मारावं अशी धडक या दुचाकीस्वारांवर बसली. त्यामुळं दोघांचेही गुडघे कामातून गेले.
वडगाव येथे फक्त दहाच मिनिटे रेल्वे थांबली होती. मात्र तेवढ्यात चोरट्यांनी पाच महिलांचे मंगळसूत्र हिसकावले. या संपूर्ण चोरीत एकूण दहा तोळ्यांचे दागिने चोरल्याची माहिती तक्रारदारांनी दिली आहे. परळी रेल्वे स्टेशनमध्ये सदर प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
परळी शहरातील एका व्यापाऱ्यास स्वस्तात सोने देतो म्हणून चाळीस लाखांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींच्या परळी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. पाकिस्तान बॉर्डरवर व गुजरातमधील भूज कच्छ या ठिकाणच्या जंगलात जाऊन, जीवावर उदार होत पोलिसांनी मुसक्या आवळून मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले.
या आंदोलनात पंख्याला तिरडीवर चढवून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. शहरातील वीज भार नियमानावर लवकरच तोडगा काढला नाही तर भाजपातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.
राम जन्मोत्सवापूर्वी मंदिरात पारंपरिक पद्धतीने आरती आणि भजनाचा कार्यक्रम झाला. पंकजा मुंडे यांनी मंदिरात स्वतःच्या हाताने आरती केली. तसेच मंदिरात सुरु असलेल्या भजनातही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.