AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Post | अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

जय पवार यांनी शेअर केलेल्या फोटोत Missing you a lot Dad असे छोटेसे कॅप्शन लिहिले आहे. तर पुढच्या फोटोमध्ये जय यांनी अजित पवार यांना घट्ट मिठी मारल्याचे आणि अजित पवार हे हसतमुखाने उभे असल्याचे दिसत आहे. या फोटोसोबत तर जय पवार यांनी अतिशय भावूक कॅप्शन लिहीली आहे. ” Dad, काश वेळ थांबली असती… मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो. ” असं त्यांनी या फोटोसोबत लिहीलं आहे. दोन्ही फोटोंमधून जय पवार यांचं वडिलांसोबतच खास, घट्ट नातं दिसत असून जय पवार अजित पवार यांना प्रचंड मिस करत असल्याचं यातून दिसत आहे.

Ajit Pawar Post | अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
| Updated on: Feb 03, 2026 | 5:31 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने अख्ख्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला, गेल्या बुधवारी ( 28 जानेवारी) अजित पवार हे सभांसाठी मुंबईहून बारामतीला जात होते. मा्तर बारामती विमानतळाजवळ आल्यानंतर त्यांचं विमान क्रॅश झालं आणि स्फोट होऊन आग लागली. यामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला, तसे आणखी चौघेही मृत्युमुखी पडले. सकाळी 8.45 च्या सुमारास हा अपघात झाला आणि तो दिवस राज्यासाठी काळा दिवस ठरला. अजित पवार यांच्या जाण्याने संपूर्ण राज्य शोकाकुल झालं. त्यांच्या कुटुंबावर तर हा अतिशय मोठा आघात आहे.

गुरूवारी (29 जानेवारी) बारामतीमध्ये शोकाकुल वातावरणात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ पवार आणि जय पवार, दादांच्या या दोन्ही मुलांनी सर्व विधी करत दादांवर अंत्यसंस्कार केले. त्यावेळी अतिशय भावूक वातावरण होते. अजित पवार यांच्या जाण्यानंतर पार्थ आणि जय, ही त्यांची दोन्ही मुलं धीरोदात्तपणे या कठीण काळाचा सामना करताना दिसली. दरम्यान आता अजित पवारांचा धाकटा मुलगा जय पवार हा वडिलांच्या आठवणीत अतिशय भावूक झालेला दिसला. जय पवार यांनी सोशल मीडियावरील त्यांच्या अकाऊंटवर अजित पवारांसोबतचे काही खास फोटो पोस्ट केले असून कॅप्शनही दिले आहे.

जय पवार यांनी शेअर केलेल्या फोटोत Missing you a lot Dad असे छोटेसे कॅप्शन लिहिले आहे. तर पुढच्या फोटोमध्ये जय यांनी अजित पवार यांना घट्ट मिठी मारल्याचे आणि अजित पवार हे हसतमुखाने उभे असल्याचे दिसत आहे. या फोटोसोबत तर जय पवार यांनी अतिशय भावूक कॅप्शन लिहीली आहे. ” Dad, काश वेळ थांबली असती… मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो. ” असं त्यांनी या फोटोसोबत लिहीलं आहे. दोन्ही फोटोंमधून जय पवार यांचं वडिलांसोबतच खास, घट्ट नातं दिसत असून जय पवार अजित पवार यांना प्रचंड मिस करत असल्याचं यातून दिसत आहे.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...