Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
शरद पवार आज सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज झाले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना फोन करून प्रकृतीची विचारपूस केली. "देशासाठी खूप काम केलेत, आता तब्येतीची काळजी घ्या. आम्ही आणि सुप्रिया देश सांभाळू, तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ठणठणीत रहा," असे मोदींनी पवारांना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज सकाळी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी मोदींनी पवारांना विश्रांती घेण्याचा आणि आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला.
पंतप्रधान मोदींनी शरद पवारांशी संवाद साधताना महत्त्वपूर्ण विधान केले. पवारांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी म्हणाले, “पवार साहेब, आपण देशासाठी खूप काम केले आहे. सुप्रियाही आता तुमच्यासारखेच काम करत आहे. सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ठणठणीत रहा.” पंतप्रधानांच्या या बोलण्याने पवार साहेब खूप गदगद झाले, असे मणियार यांनी सांगितले.
शरद पवार यांना सोमवारी खोकला आणि छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना सध्या राजकीय दौरे टाळून पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पवार आता थेट मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेणार आहेत. फेब्रुवारी महिन्यातही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Published on: Nov 04, 2026 03:49 PM
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....

