AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पक्षांतर्गत नाराजी? पहिल्यांदाच अजित पवार गटाकडून भूमिका स्पष्ट, शिष्टमंडळ अन् अमित शाह भेटीवरही मोठा खुलासा

राष्ट्रवादी अजित पवार गटात अंतर्गत नाराजी असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. अखरे यावर आता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची बाजू स्पष्ट केली आहे.

पक्षांतर्गत नाराजी? पहिल्यांदाच अजित पवार गटाकडून भूमिका स्पष्ट, शिष्टमंडळ अन् अमित शाह भेटीवरही मोठा खुलासा
Umesh PatilImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 04, 2026 | 5:27 PM
Share

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.  यामध्ये छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, यांच्यासह इतर काही नेत्यांचा समावेश होता. दरम्यान पक्षात महत्त्वाचे निर्णय घेताना डावललं जात असल्याची तक्रार या नेत्यांनी अमित शाह यांच्याकडे केल्यााच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. दरम्यान यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी पक्षांतर्गत नाराजीचं वृत्त फेटाळून लावलं आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हणाले पाटील? 

जे वार्तांकन झाले ते चुकीचे झाले.  आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि पार्थ पवार यांनी आधीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. तेव्हाच त्यांनी या शिष्टमंडळाची देखील वेळ घेतली होती. त्यांनी अमित शाह यांना सांगितलं होतं, की आमचं एक शिष्टमंडळ तुमची भेट घेणार आहे. काल राष्ट्रवादीमध्ये काही क्रायसेस झाले, अशा बातम्या समोर आल्या. अजितदादांच्या कुटुंबाकडून महाराष्ट्राच्या काही अपेक्षा आहेत. या कुटुंबाबद्दल महाराष्ट्राच्या मनात श्रद्धा आहे. रोहित पवारांनी आधी हे सांगावं ते कर्जत जामखेडमधून निवडून येणार का? आपण आधी आपलं घर सांभाळावं अन् मग गावकी बघावी.

आमच्या पक्षात सर्व चांगले चालले आहे, नियुक्त्या करताना कोणाला तरी तीथे नियुक्ती द्यावीच लागते. भुजबळ साहेब बोलले पण त्यासाठी कोअर कमिटीच्या बैठकित चर्चा झाली होती. भुजबळ साहेबांनीही आता त्याला मान्यता दिली आहे. नियुक्तीच्या बाबतीत सर्वच पक्षात  थोड्याफार प्रमाणात नाराजी असते.  भाजपचेही काही लोक असमाधानी आहेच ना,  आमदारांची तक्रार गांभिर्याने घ्यावीच लागते. विकांसकामांसाठी निधीची कमतरता झाली हे खरे आहे. आम्ही याबाबत पक्ष नेतृत्वाताला कल्पना दिली आहे, त्या या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत, असं यावेळी उमेश पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान अर्थखातं आमच्याकडे येणार आहे, आम्ही त्याची वाट पाहत आहोत, असंही यावेळी उमेश पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द