AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amnesty Scheme: महायुती सरकारचा वाहनचालकांसाठी दिलासादायक निर्णय! प्रलंबित दंडाचा बोजा कमी होणार; नव्या अभय योजनेत काय?

Traffic Challan Amnesty Scheme 2026: राज्य सरकारकडून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. थकीत ई-चलनाच्या दंडावर 20 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे.

Amnesty Scheme: महायुती सरकारचा वाहनचालकांसाठी दिलासादायक निर्णय! प्रलंबित दंडाचा बोजा कमी होणार; नव्या अभय योजनेत काय?
Traffic Challan Amnesty Scheme
| Updated on: Nov 04, 2026 | 5:09 PM
Share

महाराष्ट्रातील वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. वाहनांवरील वाहतूक नियमभंगाच्या प्रलंबित दंडामुळे अडचणीत आलेल्या वाहनधारकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. महायुती सरकारने थकीत ई-चलनाच्या दंडासाठी अभय योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली.

या निर्णयानुसार, नियमभंग केल्यामुळे वाहनांवर आकारण्यात आलेल्या आणि अद्याप भरल्या न गेलेल्या दंडाच्या रकमेवर एकवेळची बाब म्हणून 20 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली चलनाची थकबाकी भरून वाहनधारकांना आपले वाहन दंडमुक्त करण्याची संधी मिळणार आहे. राज्यात अनेक वाहनधारकांकडे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम प्रलंबित आहे.

काही वाहनधारकांकडे एकापेक्षा अधिक चलनांची थकबाकी असल्याने दंडाची एकूण रक्कम मोठी झाली आहे. अशा परिस्थितीत थकीत दंड भरताना वाहनधारकांना आर्थिक दिलासा मिळावा, या उद्देशाने सरकारने अभय योजनेचा निर्णय घेतला आहे. या योजनेचे नाव महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलन अभय योजना 2026 असे आहे. या माध्यमातून प्रलंबित दंडाची रक्कम भरण्यासाठी वाहनधारकांना सवलतीची संधी उपलब्ध होणार आहे.

विशेष म्हणजे, ही सवलत एकवेळची बाब म्हणून दिली जाणार असल्याने थकीत चलनांचा निपटारा करण्याची संधी वाहनधारकांना मिळणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारण्यात आलेला दंड वेळेत न भरल्यास त्याची थकबाकी वाढत जाते. त्यामुळे अनेक वाहनधारकांकडून दंड भरणे टाळले जाते किंवा तो पुढे ढकलला जातो. अशा वाहनधारकांसाठी ही योजना महत्त्वाची ठरू शकते.

मात्र योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय असेल, कोणत्या प्रकारच्या चलनांना सवलत लागू होईल आणि योजनेची अंमलबजावणी कधीपासून होणार, याबाबतची सविस्तर माहिती सरकारकडून स्पष्ट होणे अपेक्षित आहे. एकंदरीत थकीत वाहतूक दंडाचा भार कमी करून वाहनधारकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

Follow Us
जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला....
Sunetra Pawar : जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पडदा कधी उठणार?
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!