AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूड कलाकार धमकी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला अटक, समोल आलं मोठं कारण

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड कलाकार आणि व्यावसायिकांना धमकीचे संदेश येत आहेत. अशातच आता या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

बॉलिवूड कलाकार धमकी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला अटक, समोल आलं मोठं कारण
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 04, 2026 | 4:57 PM
Share

बॉलिवूडमधील कलाकार आणि व्यावसायिकांना धमकी देऊन खळबळ उडवणाऱ्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. अभिनेता तुषार कपूर, आयुष्मान खुराना यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आणि व्यावसायिकांना धमकी देणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. वैभव मिश्रा असे या आरोपीचे नाव असून, त्याला बेंगळुरूमधून ताब्यात घेण्यात आले.

लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकीचे संदेश

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव मिश्रा हा लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर करून सेलिब्रिटी आणि व्यावसायिकांना धमकीचे ऑडिओ संदेश पाठवत होता. या संदेशांमुळे संबंधित व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या धमक्यांमागे नेमका कोणाचा हात आहे, याचा तपास मुंबई पोलीस करत होते. अशातच आता पोलिसांना या प्रकरणात आरोपीला पकडण्यात यश आलं आहे.

आरोपी आयटी इंजिनिअर असल्याची माहिती

वैभव मिश्रा हा आयटी इंजिनिअर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अनेक अभिनेते आणि व्यावसायिकांना धमकी देण्याच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचा शोध घेतला आणि बेंगळुरूमधून त्याला अटक केली.

धमक्यांमागे नेमकं काय कारण?

या आरोपीने नेमक्या किती जणांना धमकी दिली, त्यासाठी लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर का केला आणि या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. आरोपीच्या चौकशीतून या धमकी प्रकरणातील आणखी महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, बॉलिवूड कलाकारांना लक्ष्य करून धमकीचे संदेश पाठवण्याच्या या प्रकारामुळे मनोरंजन विश्वात चिंता व्यक्त केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी टायगर श्रॉफवर हल्ला

काही दिवसांपूर्वी अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर तीन जणांनी हल्ला केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तीनही आरोपी सज्ञान असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यापैकी एक 18 वर्षाचा आहे, तर दोघे 22 वर्षांचे आहेत. हे हल्ला करणारे आरोपी काही दिवसांपूर्वी मुंबईत आले आणि त्यांनी टायरल श्रॉफला टार्गेट करत त्याच्यावर हल्ला केला. हल्ला केल्यानंतर आरोपी अंधेरी रेल्वे स्टेशनला दुचाकी सोडून पळाले. पण काही तासांमध्येच पोलिसांनी त्यांना अटक केली.

Follow Us
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक