AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan : मी कड्यावरून पडणार इतक्यात शाहरुखनं माझं जॅकेट पकडून…प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला शूटिंगदरम्यानचा प्रसंग

Mita Vashisht On Shah Rukh Khan : प्रसिद्ध अभिनेत्री मीता विशिष्टनं नुकत्याच एका मुलाखतीत सिनेमाच्या शूटिंगचा प्रसंग सांगितला आहे. शाहरुख खाननं मीताचा जीव वाचवलेला.

Shah Rukh Khan : मी कड्यावरून पडणार इतक्यात शाहरुखनं माझं जॅकेट पकडून...प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला शूटिंगदरम्यानचा प्रसंग
| Updated on: Nov 04, 2026 | 4:57 PM
Share

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान केवळ आपल्या अभिनयासाठीच नाही, तर सहकलाकारांशी असलेल्या चांगल्या वागणुकीसाठीही ओळखला जातो. अशातच आता अभिनेत्री मीता विशिष्टनं एका मुलाखतीत शाहरुखसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल से’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुखनं प्रसंगावधान राखत तिचा जीव वाचवला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मीतानं हा धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. शाहरुख खानबद्दल बोलताना मीता म्हणाली की, ‘आम्ही 1992 मध्ये ‘द इडियट‘ या सिनेमात एकत्र काम केलेलं. त्यावेळी तो सुपरस्टार नव्हता. पण, त्याच्या व्यक्तिमत्वाची जादू होती. त्याच्यात मोठा स्टार बनण्याची इच्छा आणि जिद्द होती.’

मीता विशिष्टनं सांगितला प्रसंग

‘दिल से‘ या सिनेमाची आठवण सांगताना मीता म्हणाली की, ‘या सिनेमाच्या वेळी परिस्थिती वेगळी होती. तोपर्यंत शाहरुख खूप मोठा स्टार झाला होता, तरीही तो खूप नम्रपणे वागायचा. डॅलहौसीमध्ये शूटिंगसाठी पोहोचल्यावर तो मला जुन्या मित्रासारखा भेटला. तो मोठा स्टार झालाय, त्यामुळे त्याचा स्वभाव बदलला असेल का, असं मला वाटायचं, म्हणून मी थोडं अंतर ठेवून होते. पण तो अत्यंत प्रेमाने वागला आणि शूटिंगदरम्यान त्यानं माझी खूप काळजी घेतली. दुर्दैवानं, आमचा एकत्र असलेला सर्वात छान भाग चित्रपटातून हटवण्यात आला होता.’

‘एका सीनमध्ये मी ‘AK 47’ बंदूक हातात घेऊन त्याला डोळ्यांवर पट्टी बांधून पुढे नेत होते. आम्ही डॅलहौसीमध्ये शूट करत होतो आणि तिथे प्रचंड थंडी होती. आम्ही घातलेल्या बुटांचे सोल प्लास्टिकचे होते, ज्यामुळे जमिनीवर चालताना अंदाज येत नव्हता. मणी सर सतत सांगत होते, ‘मागे जा, मागे जा.’ त्यामुळे मी खूप हळूहळू मागे जात होते. पण, एका क्षणी मला अचानक आकाश दिसू लागलं आणि मी पडतेय, असं जाणवलं. मी खरोखरच एका उतार असलेल्या कड्यावर होते आणि पडणार होते. पण शाहरूखनं एका सेकंदाच्या आत माझं जॅकेट पकडून मला वर ओढलं. एका क्षणी मी हातात बंदूक घेऊन मागे पडणार होते, पण त्यानं मला सुखरुप बाहेर काढलं. त्यानं त्या दिवशी खरंच माझा जीव वाचवला. बंदुकीचं वजन आणि त्या उतारामुळे मी सरळ खाली पडले असते आणि मला वाचवणारं कोणी नव्हतं. शाहरुखमुळे हा अनर्थ टळला.’ असं मीता म्हणाली. ‘स्क्रीन‘ला दिलेल्या मुलाखतीत मीता विशिष्ट बोलत होती.

Follow Us
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक