AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इन्स्टाग्रामवर मैत्री,लग्नाचं स्वप्न अन् 1.5 कोटी रुपयांची फसवणूक; इंजिनिअरला शेअर बाजाराच्या नफ्याचं आमिष पडलं महागात

Instagram Scam: बिहारमधल्या एका इंजिनिअरला इन्स्टाग्रामवरची मैत्री महागात पडली. त्याची तब्बल 1.5 कोटी रुपयांची फसवणूक झाली. नेमकं काय झालं आहे याबद्दल अधिक जाणून घ्या.

इन्स्टाग्रामवर मैत्री,लग्नाचं स्वप्न अन् 1.5 कोटी रुपयांची फसवणूक; इंजिनिअरला शेअर बाजाराच्या नफ्याचं आमिष पडलं महागात
Bihar Instagram scam
| Updated on: Nov 04, 2026 | 5:03 PM
Share

Bihar Crime News: बिहारमधल्या दरभंगामध्ये एक फसवणुकीचं प्रकरण समोर आलं आहे. इन्स्टाग्रामवर मैत्री एका तरुण इंजिनिअरला महागात पडली आहे. इन्स्टाग्रामवर मैत्रीच्या जाळ्यात अडकल्यामुळे एका इंजिनिअरची तब्बल १.५ कोटी रुपयांची फसवणूक झाली. एका तरुणीने त्याला प्रेम आणि लग्नाचे आमिष दाखवून, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली त्याच्याकडून १.५ कोटी रुपये उकळले. काही काळापूर्वी, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून या तरुणीची एका इंजिनिअरशी ओळख झाली. त्यानंतर तिने त्या तरुण इंजिनियरला मैत्री, प्रेम आणि लग्नाचे आमिष दाखवून, एका उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रंगवले आणि शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली त्याची १.५ कोटी रुपयांची फसवणूक केली.

नेमकं काय घडलं?

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर, पीडित तरुण इंजिनिअरने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. तो दरभंगा जिल्ह्यातील बहेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नवादा गावाचा रहिवासी आहे. दीपक कुमार नावाच्या या पीडित व्यक्तीने आपल्या पोलीस जबाबात असे सांगितले की, सुमारे तीन महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर त्याची एका तरुणीशी मैत्री झाली. तिने त्याला प्रेम आणि लग्नाचे आमिष दाखवून, भविष्यात एकत्र एक उत्तम आयुष्य जगण्याचे स्वप्न दाखवले. पण यातूनच पुढे त्याची फसवणूक झाली.

तीन महिने चाललेली फसवणूक

पीडित इंजिनिअर व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, आरोपी महिलेने शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून तब्बल १.५ कोटी रुपये उकळले. हे पैसे घेऊन ती पसार झाली. फसवणुकीचा हा संपूर्ण प्रकार अवघ्या तीन महिन्यांत घडला. या काळात, संबंधित महिलेने त्या इंजिनिअरला हाताशी धरून त्याच्याकडून ३० वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करून घेतले. पीडित व्यक्तीने सांगितले की, तीन महिने सतत संपर्कात असूनही, ती महिला कधीही व्हिडीओ कॉलवर आली नाही. ती नेहमी तरुणाशी ऑडिओ कॉलद्वारेच संवाद साधायची.

फसवणूक कशी उघडकीस आली?

पीडित तरुणाच्या सांगण्यानुसार, त्याला काही पैशांची गरज होती, म्हणून त्याने आपली जमा केलेली रक्कम परत मागितली. त्या तरुणीने त्यावेळी त्या तरुणाला सांगितले की, मेंटेनन्स सुरू आहे, त्यामुळे रक्कम मिळण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतील. दोन-तीन दिवस उलटूनही पैसे न मिळाल्याने दीपकने पुन्हा विचारणा केली, तेव्हा मात्र त्या तरुणीने एक अट घातली. तिने त्याला अट घेतली की, आपली जमा केलेली रक्कम परत मिळवण्यासाठी त्याला आधी मूळ रकमेच्या २५ टक्के अतिरिक्त रक्कम भरावी लागेल. तेव्हाच दीपकच्या लक्षात आले की तो फसवणुकीला बळी पडला आहे. त्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

Follow Us
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द