क्राईम न्यूज
आपल्या आजूबाजूला विविध गुन्हे घडत असतात. गुन्हेगारी विश्वाशी संबंधित विविध बातम्या या क्राईम न्यूजमध्ये असतात. चोरी, घरफोडी, अत्याचार, मृत्यू, खून अशा अनेक गुन्ह्यांबद्दलच्या बातम्यांचा क्राईम न्यूजमध्ये समावेश होतो. मुंबई, पुणे , नाशिकसह महाराष्ट्रातील तसेच देशातील गुन्ह्यांशी संबंधित बातम्या क्राईम न्यूज या सदरामध्ये एकत्रितपणे वाचता येतील.
Read Moreअभिजीत दीपकेंना मोठा हादरा… पोलिसांची सर्वात मोठी अॅक्शन, थेट 500… मानवाधिकार आयोगाची एन्ट्री
अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील मुंबईतील शिवाजी पार्क येथील सीजेपी आंदोलनाप्रकरणी आयोजकांसह ४००-५०० अज्ञात समर्थकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आंदोलनात अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले होते.
- भीमराव गवळी
- Updated on: Oct 3, 2026
- 6:00 pm
मिनाक्षी शिंदे यांच्या अडचणी वाढल्या, चौकशी होणार? पूर्णेकर हत्या प्रकरणाची मोठी अपडेट समोर
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणात शिंदे गटाच्या नेत्या मिनाक्षी शिंदे यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, ज्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
- भीमराव गवळी
- Updated on: Oct 3, 2026
- 12:04 pm
26 वर्षाचा तरुण, 46 वर्षाची महिला आणि 9 दिवस… हॉटेलमध्ये सापडले…; मॅनेजर काय म्हणाला?
उत्तर प्रदेशच्या बहराइच येथील एका हॉटेलमध्ये 26 वर्षीय तरुण आणि 46 वर्षीय महिलेचे मृतदेह पंख्याला लटकलेले आढळले. नऊ दिवसांपासून ते हॉटेलमध्ये थांबले होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, त्यांच्या मृत्यूमागचे कारण आणि संबंध यावर अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
- भीमराव गवळी
- Updated on: Oct 2, 2026
- 3:07 pm
पूर्णेकर हत्या प्रकरणात सर्वात मोठं यश, दोन शूटरना अटक, त्या दोन महिलांमुळे… काय होता प्लान?
ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात पोलिसांनी तिसऱ्याच दिवशी दोन शूटरला मुंबई-गोवा महामार्गावरून अटक केली आहे. संशयित महिलांच्या चौकशीतून हा धागा मिळाला. या अटकेमुळे पूर्णेकर यांच्या हत्येमागील नेमके कारण आणि सूत्रधार कोण, याचा उलगडा होण्यास मदत होणार असून ठाणे गुन्हे शाखेने हे मोठे यश मिळवले आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Oct 2, 2026
- 10:09 am
4 वर्षं 80 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह फ्रीजरमध्ये! ‘क्रायोनिक्स’ म्हणजे काय? मृतदेह पुन्हा जिवंत होऊ शकतो?
मालाडमधील एका क्लिनिकमध्ये 4 वर्षांपासून फ्रीजरमध्ये ठेवलेला 80 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. 'क्रायोनिक्स' तंत्रज्ञानाने भविष्यात वडिलांना जिवंत करता येईल, या आशेवर कुटुंबीयांनी तो जतन केला होता. या घटनेने खळबळ उडाली असून, क्रायोनिक्स पद्धत, तिची कायदेशीर वैधता आणि भारतात मृतदेह जतन करण्याच्या नियमांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Oct 1, 2026
- 5:19 pm
रुम नंबर 404 आणि जीवघेणी साडी… बिल्डरचा टोकाचा निर्णय; ऑफिसच का निवडलं?
इंदूरचे बिल्डर संदीप नागर यांनी जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. पलासिया पोलीस या प्रकरणाचा तिहेरी अँगलने तपास करत आहेत: कौटुंबिक वाद, व्यावसायिक स्पर्धा आणि ब्लॅकमेलिंग. ऑफिसच्या रूम नंबर 404 मध्ये साडीने गळफास घेतल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. घटनेमागील गूढ उकलण्यासाठी पोलीस कुटुंबीय आणि मित्रांची चौकशी करत आहेत.
- भीमराव गवळी
- Updated on: Oct 1, 2026
- 12:56 pm
चार वर्षं फ्रीजरमध्ये मृतदेह! मालाडच्या क्लिनिकमध्ये नेमकं काय घडलं? मुंबईत खळबळ
मालाडमधील एका क्लिनिकमध्ये चार वर्षांपासून फ्रीजरमध्ये ठेवलेला एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने मुंबईत खळबळ उडाली आहे. 2022 मध्ये कर्करोगाने निधन झालेल्या 80 वर्षीय वृद्धाचा मृतदेह, कुटुंबीयांनी भविष्यात तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांना जिवंत करता येईल या आशेने जपून ठेवला होता. पोलिसांकडून घटनेचा कसून तपास सुरू आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Sep 30, 2026
- 5:39 pm
कपडे शिवता शिवताच गोळ्यांचा आवाज… मारेकऱ्यांच्या हातात चाकू… प्रत्यक्षदर्शीने सांगितला ठाण्यातला थरार
ठाण्यात ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले, गोळ्यांचा आवाज ऐकून बाहेर आले तेव्हा हल्लेखोरांच्या हातात चाकू होता. पूर्णेकर कुटुंबीयांनी माजी महापौरांच्या पतीवर हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Sep 30, 2026
- 4:44 pm
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमागचं खरं कारण आलं समोर, एकाला अटक; पोलिसांचा सर्वात मोठा दावा काय?
ठाकरे गट नेते प्रदीप पूर्णेकर हत्येचं खरं कारण समोर आलं असून, एकाला अटक झालीय. राजकीय आणि सामाजिक वादातून हत्या झाल्याची आरोपीने कबुली दिली. ठाणे पोलिसांनी इतर आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. पूर्णेकर कुटुंबीय आणि शिवसैनिकांनी सर्व आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला असून, पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने सुरू आहेत.
- भीमराव गवळी
- Updated on: Sep 30, 2026
- 2:16 pm
Ketan Agarwal Murder : लग्नासाठी कोट्यवधी खर्च? विशाल अग्रवालांनी फेटाळला दावा ; उदयपूर लग्नाबाबत दिली मोठी माहिती
केतन अग्रवाल हत्याकांडात वडिलांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. लग्नावर कोट्यवधी खर्च झाल्याच्या अफवा नाकारल्या. 'माही जे' या खोट्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे केतनला लोहगडावर फसवून नेल्याचं त्यांनी सांगितलं. सिया आणि चेतन चौधरीनेच हे खोटं अकाऊंट चालवल्याचा आरोपही केला. एका साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा दावाही अग्रवाल यांनी केला.
- manasi mande
- Updated on: Sep 29, 2026
- 3:29 pm
Ketan Agarwal Murder : केतनच्या पाठीवर सियाचा टॅटू, आणि त्याच्या फोनमध्ये… बहिणीने काय काय सांगितलं ?
केतन अग्रवाल हत्याप्रकरणात 3 महिन्यांनंतर नवे खुलासे झाले आहेत. चार्जशीटनुसार, केतनच्या पाठीवर 'सिया' नावाचा टॅटू होता, जो त्याच्या बहिणीने सियाला दाखवला. लोहगडावर सियाने केतनला धक्का दिला होता, असा दावाही संजना अग्रवालने केला आहे.
- manasi mande
- Updated on: Sep 29, 2026
- 2:54 pm
हबी… वाईफी… मुलांची आई, सिया-चेतनचे ते मेसेज… अनेक तरुणांशी… केतन अग्रवाल प्रकरणात मोठा खुलासा
केतन अग्रवाल प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सिया आणि चेतन हे एकमेकांना 'हबी-वाईफी' म्हणत असल्याच्या चॅट्स समोर आल्या आहेत. केतनच्या हत्येत सियाच्या कुटुंबाचाही सहभाग असल्याचा दावा विशाल अग्रवाल यांनी केला आहे. साक्षीदारांना धमकावण्यात आले असून, सियाचे अनेकांशी संबंध होते. ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी विशाल अग्रवाल यांनी केली आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Sep 29, 2026
- 2:04 pm