AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही, मग आठवड्यातून फक्त एकदाच करा हे छोटं काम, तिजोरी पैशांनी भरून जाईल

वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा तुम्ही कितीही पैसे कमावले तरी ते तुमच्या हातात टिकत नाही, पैशांची जर बचत होत नसले तर त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही, मग आठवड्यातून फक्त एकदाच करा हे छोटं काम, तिजोरी पैशांनी भरून जाईल
Vastu Shastra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 16, 2026 | 9:42 PM
Share

अनेकजण पैसे कमावण्यासाठी प्रचंड मेहनत करतात, परंतु त्यांना नोकरी व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळत नाही. कधीकधी व्यवसायामध्ये अचानक मोठं नुकसान होतं. पैशांची आवक प्रचंड असते, मात्र पैसा हातात टिकत नाही. पैशांची बचत होत नाही, अशा घटना घडतात. अशा घटना का घडतात तर त्यामागे अनेक कारणं असू शकतात. मात्र तुमच्या घरातील वास्तुदोष हे देखील त्यातील एक कारण असू शकतं. वास्तुशास्त्रामध्ये वास्तुदोष दूर करण्यासाठी विविध उपाय सांगितले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार माता लक्ष्मी ही धनाची देवता आहे. जर लक्ष्मी माता प्रसन्न झाली, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही धनाची कमी राहणार नाही. शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा वार असतो, त्यामुळे शुक्रवारी काही खास उपाय केल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतो, आणि तुमची प्रगती होते. चला तर मग जाणून घेऊयात शुक्रवारी करण्याच्या उपायांबद्दल.

पूजा – शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे, त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी, माता लक्ष्मीची पूजा करावी, तिची मनोभावे प्रार्थना करावी. तसेच माता लक्ष्मीला लाल रंग आवडतो, त्यामुळे माता लक्ष्मीला लाल गुलाबाच्या फुलांची माळा घालावी, तसेच लक्ष्मी स्त्रोताचं पठण करावं, यामुळे माता लक्ष्मीचा सैदव तुमच्यावर आशीर्वाद राहील आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही धनाची कमी भासणार नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

शुक्रवारी करा हा उपाय – शुक्रवारी सायंकाळच्या वेळी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर एक दिवा लावू शकातत. दर शुक्रवारी हा उपाय केल्यास लक्ष्मी माता प्रसन्न होते. तुमच्यावर कधीही आर्थिक संकट येत नाही, तसेच पती-पत्नीमध्ये देखील भांडणं होत नाहीत.

शुक्रवारी सांयकाळच्या वेळी श्री यंत्राची पूजा करावी, लक्ष्मी मातेच्या मंत्रांचा जप करावा किंवा लक्ष्मी चालीसाचा पाठ करावा, यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, आणि आपल्या मागील सर्व प्रकारची आर्थिक सकंट दूर होतात, तसेच ज्या व्यक्तीवर कर्ज आहे, त्या व्यक्तीने हा उपाय केल्यास त्याची देखील कर्जातून मुक्तता होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा