AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन लाखांची कर्जमाफी कोणामुळे झाली, रोहित पवार नव्हे तर फडणवीसांनी दिलं या नेत्याला क्रेडिट!

सरकारने केलेली कर्जमाफी ही फसवी आहे. सरकारने कर्जमाफीसाठी घातलेली 50 हजारांची अट रद्द करावी, अशी मागणी शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली होती. हीच मागणी घेऊन त्यांनी पंढरुपुरात बेमुदत उपोषणही सुरू केले होते.

दोन लाखांची कर्जमाफी कोणामुळे झाली, रोहित पवार नव्हे तर फडणवीसांनी दिलं या नेत्याला क्रेडिट!
devendra fadnavis and rohit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 14, 2026 | 4:01 PM
Share

Farmer Loan Waiver : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत शेतकरी कर्जमाफीसाठीच्या निकषात काही बदल करण्यात आले आहेत. सरकारने कर्जमाफीसाठीची 50 हजार रुपयांची मर्यादा काढून टाकली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. यावरच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. त्यांनी सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे क्रेडिट आमदार रोहित पवार यांना न देता अन्य व्यक्तीला देऊन टाकले आहे.

सरकारने केलेली कर्जमाफी ही फसवी आहे. सरकारने कर्जमाफीसाठी घातलेली 50 हजारांची अट रद्द करावी, अशी मागणी शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली होती. हीच मागणी घेऊन त्यांनी पंढरुपुरात बेमुदत उपोषणही सुरू केले होते. दरम्यान सरकारने कर्जमाफीच्या निकषात बदल केले आहेत. त्याचा फायदा राज्यातील 13 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. यावरच देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली आहे. मी याबाबत विधानसभेत घोषणा केली होती. आजपर्यंत सर्व कर्जमाफी योजनांमध्ये लगतच्या कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलं. परंतु यावेळी आम्ही खास बाब म्हणून 50 हजारांची मर्यादा घालून अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्यााच निर्णय घेतला होता. परंतु रणधीर सावरकर यांच्या नेतृत्त्वात सत्ताधारी पक्षाचे आमदार मला भेटले. त्यांनी मला 50 हजारांची मर्यादा काढून टाकावी. शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच कर्जमाफी द्यावी, अशी मागणी केली. त्यामुळे राज्याच्या इतिहासात याआधीच्या कर्जमाफी योजनात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचाही यावेळच्या कर्जमाफी योजनेत सहभाग करण्यात आला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

याच कर्जमाफी योजनेत आणखी एक अट होती. 2026-2027 सालचे थकित पैसे भरले तर शेतकऱ्यांना प्रोप्त्साहनपर पैसे मिळतील, असा निर्णय घेण्यात आला होता. आता हा निर्णय रद्द करण्यात आला हता. 2025-2026 सालाचे पैसे ज्या शेतकऱ्यांनी भरले असतील तर अशा शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत मिळणार आहे. या निर्णयामुळे काही शेतकरी अपात्र झाले असते, ते आता पात्र ठरले आहेत. आता देशातील आणि राज्यातील सर्वात मोठी कर्जमाफी आपण जाहीर केली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

फडणवीसांनी घेतले सत्ताधारी आमदारांचे नाव

दरम्यान, सर्व शेतकऱ्यांन लाभ मिळावा यासाठी रोहित पवार यांनी उपोषण केले होते. त्यांची भेट मंत्री गिरीश महाजन यांनी घेऊन निकषात बदल करण्यास सकारात्मकता दाखवली होती. परंतु फडणवीस यांनी मात्र सत्ताधारी आमदारांना या निकषबदलाचे क्रेडिट दिले आहे. त्यामुळे फडणवीसांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक