AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिवसेनेला लॉटरी लागणार? फुटीर खासदारांना थेट दिल्लीत... अमित शहांसोबत महत्त्वाची बैठक

मोठी बातमी! शिवसेनेला लॉटरी लागणार? फुटीर खासदारांना थेट दिल्लीत… अमित शहांसोबत महत्त्वाची बैठक

| Updated on: Jul 14, 2026 | 11:31 AM
Share

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. काही आठवड्यांपूर्वी ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे.

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. काही आठवड्यांपूर्वी ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे.

ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झालेल्या खासदारांबाबत आता नवी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. या खासदारांना आगामी काळात केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः मंत्रीपदाच्या चर्चांनी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटातील हे खासदार लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत आगामी राजकीय रणनीती आणि सत्तेतील प्रतिनिधित्वाबाबत चर्चा होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. राजकीय चर्चांनुसार, शिवसेनेकडे एक राज्यमंत्रीपद तसेच एक कॅबिनेट मंत्रीपद येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होण्याची शक्यता असून, त्यानंतर पुढील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 14, 2026 11:23 AM

Follow Us