AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : ‘तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि तुम्हाला..’ मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागणारा वार

"25-26 चे पैसे भरले असतील त्यांना प्रोत्साहनपर मदत मिळणार आहे. यामुळे काही शेतकरी जे अपात्र झाले असते तर ते सगळे पात्र झाले आहेत. आता देशातली राज्यातली कर्जमाफी 56 लाख शेतकऱ्यांकरता जाहीर केली आहे" असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis : 'तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि तुम्हाला..' मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागणारा वार
Devendra Fadnavis
| Updated on: Jul 14, 2026 | 3:55 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राहुल गांधी यांनी पेपर फुटीवरुन केलेल्या टीकेला उत्तर दिलं. त्याचवेळी ते शेतकरी कर्जमाफी योजनेचा कसा फायदा होणार आहे हे सुद्धा त्यांनी विस्ताराने सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा रामरक्षा आंदोलनावरुन टीका केली.”पेपरफुटीबद्दल राहुल गांधींना कदाचित कल्पना नसेल की सरकारने कारवाई करुन पेपर फोडणाऱ्यांना पकडलं आहे. म्हणून ती परिक्षा पुढे गेलीय. पेपर फुटल्यानंतर नाही त्याआधी महाराष्ट्र सरकारने पोलिसांनी कारवाई केली आहे. निश्चित पुढची परीक्षा योग्य पद्धतीने होईल. नियोजन चालू आहे. त्याच्या तारखा लवकरच घोषित करु” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “राहुल गांधींनी हे टि्वट देशातून केलय की परेदशातून ते माहित नाही. बऱ्याचदा ते परदेशात असतात. राहुल गांधींनी जे मुद्दे उपस्थित केलेत, मला वाटतं की आधीच या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. पकडले गेलेले गुन्हेगार आंतरराज्यीय गुन्हेगार निघाले आहेत. त्यांनी इतर राज्यातही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. इतर राज्यातील पेपर फुट वाचवण्याचं काम आपल्या सरकारने केलय. राहुल गांधी यांनी आपल्या पक्षाकडे, सरकारकडे बघावं नंतर बोलावं” असं देवेंद्र फडणवीस यांनी सुनावलं.

“मी विधानसभेत घोषणा केली होती. आजपर्यंत सगळ्या कर्जमाफी योजनांमध्ये लगतच्या कर्जमाफी योजनेतले जे पात्र उमेदवार असतात, त्यांना अपात्र करण्यात आलं. यावेळी आम्ही त्यांना 50 हजारापर्यंत पात्र करण्याचा निर्णय घेतला. रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात सत्ताधारी पक्षाचे आमदार भेटले. त्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी. म्हणून पहिल्यांदा राज्याच्या इतिहासात कर्जमाफीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. दुसरी जी अट होती 26-27 चे पैसे भरले तर प्रोत्साहनपर पैसे मिळतील, ती 26-27 ची अट काढून टाकली आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरे हे हताश, फ्रस्ट्रेड व्यक्ती

रामरक्षा आंदोलनावरुन त्यांनी उद्धव ठाकरेंचा सुद्धा समाचार घेतला. “माझी एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी किमान दोन पान रामरक्षेची वाचावी. रामाच्या नावाने आंदोलन करणं योग्य नाही. मागच्यावेळी ते रामरक्षा वाचू शकले नव्हते. त्यांची तयारी असेल तर मी सुद्धा त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे. मला पूर्ण रामरक्षा येते. समजा येत नसती, तर किमान वाचता तरी आली पाहिजे. तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षा वाचता येत नाही. कुठलं आंदोलन आहे तुमचं” अशा शब्दात त्यांनी टीका केली. उद्धव ठाकरे हे हताश, फ्रस्ट्रेड व्यक्ती आहेत अशी टीका सुद्धा फडणवीसांनी केली.

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट! पत्रात मोठी विसंगती; 18 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी...
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
NCP | फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संजय राऊत संतापलेच! 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्यानंतर थेट..
संजय राऊत संतापलेच! 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्यानंतर थेट...
ओमराजे की श्रीकांत शिंदे, अमित शहांचा वरदहस्त नेमका कोणावर? दिल्लीतील
ओमराजे की श्रीकांत शिंदे, अमित शहांचा वरदहस्त नेमका कोणावर? दिल्लीतील बैठकीत...
थेट "भावी कॅबिनेट मंत्री..." बीडमधील मुंडेंच्या बॅनर्सची जोरदार चर्चा,
Dhananjay Munde | थेट
मोठी बातमी! शिवसेनेला लॉटरी लागणार? फुटीर खासदार थेट दिल्लीत...
मोठी बातमी! शिवसेनेला लॉटरी लागणार? फुटीर खासदारांना थेट दिल्लीत... अमित शहांसोबत महत्त्वाची बैठक
अखेर निर्णय होणारच! शरद पवारांचे 10 पैकी 9 आमदार... मोठी राजकीय घडमोड
अखेर निर्णय होणारच! शरद पवारांचे 10 पैकी 9 आमदार... मोठी राजकीय घडमोड