AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी आनंदवार्ता! दुबार पेरणीचा खर्च सरकार देणार? चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा, कसा मिळणार निधी, कसा फायदा होणार?

Chandrashekhar Bawankule on Re Sowing: दुबार पेरणीचे संकट असलेल्या शेतकर्‍यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आता दुबार पेरणीसाठीच्या खर्चासाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे ठाकले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयीची मोठी घोषणा केली आहे.

मोठी आनंदवार्ता! दुबार पेरणीचा खर्च सरकार देणार? चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा, कसा मिळणार निधी, कसा फायदा होणार?
मोठी आनंदवार्ता! दुबार पेरणीचा खर्च सरकार देणार?
| Updated on: Jul 14, 2026 | 3:51 PM
Share

DPC Funds Use for Re Sowing: शेतकर्‍यांसाठी मोठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. अनेक भागात शेतकर्‍यांनी पेरणी केली. पण बोगस बियाणे अथवा पावसाने ओढ दिल्याने शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. शेतकरी आसामानी आणि कंपन्यांच्या संकटांमुळे नागवला जात आहे. त्यातच महायुती सरकारने त्यांच्यासाठी एक मोठी आनंदवार्ता आणली आहे. दुबार पेरणीचा खर्च सरकार देणार आहे. याविषयीची मोठी घोषणा आज करण्यात आली आहे. काय आहे मोठी अपडेट?

डीपीसीमधून दुबार पेरणीचा खर्च

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मध्यामांशी बोलताना एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, बोगस बि बियाणे पेरले की ते उगवत नाही किंवा लावलेले बियाणे उद्ध्वस्त होतं. शेतकर्‍यांवरील हे संकट पाहता, इथून पुढे दुबार पेरणी करता लागणार निधी हा डीपीसीमधून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बि-बियाणे आता सरकार उपलब्ध करून देणार आहे. दुबार पेरणी संदर्भात डीपीडीसी मधून निधी दिला जाईल. याविषयीचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवतील त्यानुसार निर्णय घेतला जाईल. बोगस बियाणे दिले आहे त्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी जाहीर केले आहे.

शेत-पांदण रस्त्यांना क्रमांक

वन हक्के पट्टे बाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत. शेत पांदण रस्त्यांना क्रमांक देणे ,योग्य रस्ता असणे यासाठी डॅशबोर्ड तयार केला जाणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. तुकाराम मुंडे चांगलं काम करत आहेत. ⁠ज्या दुध डेअरी वरती कारवाई केली आहे त्या कंपन्या राहिल्या नाही पाहिजे असे बावनकुळे म्हणाले.

इगतपुरीप्रकरणात कडक कारवाई

पंढरपुरी वारीमध्ये जे मृत्यू झाले आणि जखमी झाले त्यांना शासन मदत करणार असल्याचे बावनकुळे यांनी जाहीर केले. इगतपुरी परिसरात मुंबईतील पर्यटक कुटुंबावर गावगुंडांनी हल्ला केल्याप्रकरणात कडक कारवाईचे निर्देश देण्यात आल्याचे बावनकुळे म्हणाले.

कायदेशीररित्याच खासदार शिंदे गटात

ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना सर्व खासदार विचार करुनच त्यांनी निर्णय घेतला असेल. त्यामुळे मागे पुढे वेळ लागू शकतात. कायदेशीरित्याच खासदार शिंदे गटात गेल्याचे बावनकुळे म्हणाले. राष्ट्रवादी शरद पवार गट विलिनिकरणाविषयी जयंत पाटील किंवा शरद पवार यांना विचारावा लागेल किंवा रोहीत पवार मुंबईत असतील तर त्यांना विचारावा लागेल, अशी प्रतिक्रिया बावनकुळे म्हणाले.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक