AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर निर्णय होणारच! शरद पवारांचे 10 पैकी 9 आमदार... मोठी राजकीय घडमोड

अखेर निर्णय होणारच! शरद पवारांचे 10 पैकी 9 आमदार… मोठी राजकीय घडमोड

| Updated on: Jul 14, 2026 | 11:04 AM
Share

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटानंतर आता शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतही विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षातील 10 पैकी 9 आमदारांनी एनडीएसोबत जाण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे.

पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान भवनात झालेल्या बैठकीत आमदारांची मते जाणून घेण्यात आली. या बैठकीत आमदार रोहित पवार उपस्थित नव्हते. बैठकीत विकासकामांसाठी निधी आणि आगामी 2029 च्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

आमदारांनी भाजपप्रणित एनडीए आघाडीसोबत जाण्याचा पर्याय विचारात घ्यावा, अशी सूचना केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच घेतला जाईल, असे जयंत पाटील यांनी आमदारांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, रोहित पवार यांनी काही आमदारांशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचेही समोर आले आहे. आता शरद पवार लवकरच आमदार आणि खासदारांची बैठक घेणार असल्याची चर्चा असून, या बैठकीनंतर पक्षाची पुढील भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Published on: Jul 14, 2026 11:02 AM

Follow Us