NCP | फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत वाद उफाळून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्षाच्या अध्यक्षपदी झालेल्या सुनेत्रा पवार यांच्या निवडीवरच आक्षेप घेतला गेल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. यावर आता बड्या नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत वाद उफाळून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्षाच्या अध्यक्षपदी झालेल्या सुनेत्रा पवार यांच्या निवडीवरच आक्षेप घेतला गेल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीला आव्हान देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पक्षात नाराजीचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीही सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासह सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
या सर्व घडामोडींवर भाष्य करताना काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत भविष्यात मोठी फूट पडू शकते, असे म्हटले आहे.
ऑपरेशन टायगर यावरही हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका करत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
Published on: Jul 14, 2026 12:51 PM
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...

