AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लता मंगेशकर यांच्यामुळे संपलं करिअर? चर्चांवर अखेर अनुराधा पौडवाल यांनी सोडलं मौन

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लता मंगेशकर यांच्याशी झालेल्या तुलनेबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या. लता मंगेशकर यांच्यामुळे अनुराधा पौडवाल यांचं करिअर संपुष्टात आल्याची चर्चा होती.

लता मंगेशकर यांच्यामुळे संपलं करिअर? चर्चांवर अखेर अनुराधा पौडवाल यांनी सोडलं मौन
अनुराधा पौडवाल, लता मंगेशकरImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 14, 2026 | 3:39 PM
Share

बॉलिवूडच्या सर्वोत्तम गायिकांपैकी एक अनुराधा पौडवाल यांची एकेकाळी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याशी तुलना केली जायची. याच तुलनेतून एक वाद जन्माला आला होता की लता मंगेशकर यांनी अनुराधा यांना कधीच पुढे जाऊ दिलं नाही. या चर्चांवर आता खुद्द अनुराधा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 70-80 च्या दशकात आणि त्यानंतरही बॉलिवूडमध्ये लता मंगेशकर यांचा बोलबाला होता. कोट्यवधी लोक त्यांच्या आवाजाचे चाहते होते आणि आजही आहेत. याचदरम्यान अनुराधा पौडवाल यांनी इंडस्ट्रीत करिअरची सुरुवात केली होती आणि हळूहळू त्यांचीही गाणी देशातील कानाकोपऱ्यात ऐकायला मिळत होते. मात्र जेव्हा अनुराधा यांच्या करिअरला उतरती कळा लागली, तेव्हा काही लोकांनी अशी टीका करण्यास सुरुवात केली की, लता मंगेशकर यांनी त्यांना पुढे जाऊ दिलं नाही.

काय म्हणाल्या अनुराधा पौडवाल?

आता अनेक वर्षांनंतर अनुराधा पौडवाल यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. एका पॉडकास्ट मुलाखतीत त्या म्हणाल्या, “गुरूंची बरोबरी कोणीच करत नाही, असं मी मानते. गुरूंना फॉलो केलं जातं, त्यांची पूजा केली जाते. मला त्यांच्याकडून जितकं शिकता आलं, तितकं मी शिकले. दुसरी गोष्ट म्हणजे, लोकांचे विचारच असे आहेत, कारण ते आमची तुलना करतात. त्यामुळे त्यांनी मला पुढे जाऊ दिलं नाही, हे ऐकायला त्यांना फार मसालेदार वाटतं. लतादीदींची कला ज्या शिखरावर होती, त्या शिखराजवळ तरी पोहोचलं पाहिजे ना, तेव्हाच तुलना होईल.” यावेळी त्यांना लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यापैकी कोण आवडत्या गायिका आहेत, असं विचारलं असता त्यांनी लतादीदींचं नाव घेतलं.

अनुराध पौडवाल या 1973 पासून संगीतक्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी बॉलिवूड चित्रपटांमधील अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. मात्र भक्तीगीतांमधून त्यांना सर्वाधिक यश मिळालं. त्यांनी विविध भाषांमध्ये नऊ हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत. भक्ती संगीत आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील अमूल्य योगदानामुळे त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. चाहत्यांनी त्यांना ‘भजन क्वीन’, ‘मेलडी क्वीन’ आणि ‘भक्तीचा अमर आवाज’ अशी विशेषणंही दिली आहेत.

Follow Us
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'
राजीनामा द्या, आदिवासी आंदोलक अन् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंविरोधात एल्गार: राजीनाम्याची मागणी
रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल
अहिल्यानगर: रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल, सात आरोपींना जन्मठेप
मराठा आरक्षणावर ठाम भूमिका: निर्णायक आंदोलनाचे आवाहन
मराठा आरक्षणासाठी अंतिम आंदोलनाची घोषणा