AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाश्त्यात नेहमी तेच कांदेपोहे खाण्याऐवजी पोह्यांपासून बनवा ‘हे’ चविष्ट, सोपे पदार्थ, जाणून घ्या झटपट रेसिपी

आपल्यापैकी अनेकांना नाश्त्यात पोहे खायला आवडतात. कारण पोह्यामध्ये अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात, ज्यामुळे तो एक आरोग्यदायी पर्याय ठरतो. चला पोह्यापासून बनवता येतील अशा काही चविष्ट आणि सोप्या पदार्थांबद्दल जाणून घेऊयात.

नाश्त्यात नेहमी तेच कांदेपोहे खाण्याऐवजी पोह्यांपासून बनवा 'हे' चविष्ट, सोपे पदार्थ, जाणून घ्या झटपट रेसिपी
कांदेपोहेImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jul 14, 2026 | 3:55 PM
Share

महाराष्ट्रात प्रत्येक घरांमध्ये सकाळाच्या नाश्त्यात कांदा पोहे बनतच असतात. कारण पोहे हा एक हलका, चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे जो अनेकांना आवडतो. पण नेहमी नाश्त्यात तेच तेच कांदे पोहे खाण्याऐवजी पोह्यापासून तुम्ही विविध प्रकारचे चविष्ट आणि झटपट पदार्थ बनवू शकता. पोह्यापासून पदार्थ झटपट तयार होत असल्यामुळे आणि सहज पचत असल्यामुळे, पोहे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांमध्येच लोकप्रिय झाले आहेत. म्हणूनच ते रोजच्या आहाराचा एक भाग बनले आहेत. पोह्यामध्ये प्रामुख्याने कर्बोदके, तसेच अल्प प्रमाणात प्रथिने , लोह, फायबर आणि बी जीवनसत्त्वे असतात. त्याचे संतुलित प्रमाणात सेवन केल्यास ऊर्जा मिळण्यास, पोट जास्त वेळ भरलेले राहण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पोह्यामध्ये भाज्या, शेंगदाणे, डाळी किंवा चीज यांसारखे पौष्टिक घटक घातल्यास त्याचे पौष्टिक मूल्य आणखी वाढू शकते. चला, पोह्यापासून बनवल्या जाणाऱ्या काही स्वादिष्ट आणि सोप्या पाककृती आणि त्या बनवताना कोणती खबरदारी घ्यावी, हे जाणून घेऊया.

पोह्यांपासून हे 5 चविष्ट आणि सोपे पदार्थ बनवा

पोहा कटलेट

पोहे धुवून काही मिनिटे मऊ होऊ द्या. त्यात उकडलेले बटाटे, गाजर, वाटाणे, कोथिंबीर आणि मसाले टाकून त्याचे कटलेट्स बनवा. अगदी कमी तेलात तव्यावर तळून घ्या. भाज्यांमधून मिळणारे फायबर, कर्बोदके आणि जीवनसत्त्वे यांचे हे एक उत्तम मिश्रण आहे.

पोहा चीला

भिजवलेल्या पोह्यांमध्ये बेसन, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मसाले टाकून घट्ट मिश्रण तयार करा. हे मिश्रण तव्यावर पसरवून दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. हा एक झटपट नाश्ता आहे, जो प्रथिने, फायबर आणि ऊर्जेचा चांगला स्रोत ठरू शकतो.

पोहा टिक्की

मऊ केलेल्या पोह्यांमध्ये उकडलेले बटाटे, किसलेले गाजर, कोथिंबीर आणि आवडीचे मसाले टाकून टिक्की बनवा. त्यांना तव्यावर हलके तळा किंवा एअर फ्राय करा. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेला हा पदार्थ चविष्ट तसेच पौष्टिक आहे.

पोहा उत्तपम

पोहे आणि दही वाटून त्याचे मिश्रण तयार करा. त्यात रवा, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि कोथिंबीर टाकून काही वेळ मिश्रण झाकून ठेवा. त्यानंतर तव्यावर मिश्रण टाकून उत्तपमप्रमाणे शिजवा. हा पदार्थ भाज्या, फायबर आणि कर्बोदकांनी भरपूर असून नाश्त्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.

पोहा इडली

पोहे, रवा आणि दही एकत्र करून थोडा काहीवेळ झाकून ठेवा. नंतर त्यात थोडे बेकिंग पावडर टाकून इडलीच्या साच्यात वाफवून घ्या. कमीत कमी तेलात तयार होणारा हा हलका, मऊ आणि सहज पचणारा पदार्थ संतुलित नाश्त्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

पोह्यापासून पदार्थ बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

पोह्यापासून पदार्थ बनवताना सर्वप्रथम योग्य प्रकारचे पोहे निवडा आणि ते जास्त वेळ पाण्यात भिजवू नका, कारण त्यामुळे ते खूप मऊ होऊन तुटू शकतात. पोहे हलक्या हाताने धुवा आणि ते व्यवस्थित फुगण्यासाठी काही मिनिटे बाजूला ठेवा.

मीठ आणि मसाले माफक प्रमाणात वापरा आणि कमीत कमी तेलात शिजवण्याचा प्रयत्न करा. ताजे साहित्य वापरा आणि पोह्यांची चव व पोषणमूल्ये दोन्ही टिकवून ठेवण्यासाठी ते तयार झाल्यावर लगेच खा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ