AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग शिवसेनेचा कोणत्या पदावार दावा? शिंदेंनी दिलं थेट उत्तर

केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग शिवसेनेचा कोणत्या पदावार दावा? शिंदेंनी दिलं थेट उत्तर

| Updated on: Jul 14, 2026 | 4:15 PM
Share

सध्या राज्यभर केंद्रातील तसेच राज्यातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या चर्चांना जोर धराला आहे. महत्त्वाचं म्हणजे महायुतीतली शिंदेंचं शिवसेना पक्ष हे ठाकरेंचे फुटीर खासदार त्यांच्या पक्षात आल्याने अधिक मजबुत झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळे त्यांना कोण कोणेत पद मिळतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. याबाबत आता खुद्द एकानाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी एका वाक्यातच महायुतीच्या वैचारिक ताकदीची जाणीव करून दिली आहे.

पक्षाची ताकद वाढली आहे, आता तुम्ही अमित शाहांची भेटही घेणार आहात तर मग मंत्रिमंडळाच्या विस्तारत तुम्ही कोणत्या पदाचा दावा करणार आहत? असा प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं की, आमची युती ही पदासाठी नाही तर विचारांची युती आहे. शिवसेना NDA ची ताकत वाढण्याचं काम करेल. आम्ही कधीच बार्गेनींग केली नाही आणि करणार नाही.

एकनाथ शिंदे यांनी नीट पेपरबाबत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत सांगितले की, ‘2014 पूर्वी झालेले घोटाळे युवा वर्गाने पाहिलेले आहेत, त्यामुळे युवक आजपर्यंत मोदींसोबत आहे. या काळात झालेली देशाची प्रगती तो पाहत आहे. युवकांना काम मिळत आहे, युवक मोदींच्या सोबत आहे. त्यामुळे यांच्या मनात जे आहे, देशात अराजकता पसरली पाहिजे, देशात कायदा सुव्यवस्था बिघडली पाहिजे, यासाठी हे लोकांना भडकवण्याचे काम करत आहेत. परंतू त्यांच्या प्रयत्नांना यश कधीच येणार नाही. कारण या देशाला आणि राज्याला एक संस्कृती आहे, हा विरोधकांचा एक केविलवाणा प्रयत्न आहेत.

Published on: Jul 14, 2026 04:15 PM

Follow Us