Sanjay Raut : SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय…; मनोज जरांगे प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
संजय राऊत यांनी मराठा आंदोलनासाठी ₹500 कोटींच्या कथित व्यवहारावरून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. श्रीकांत शिंदेंना हे पैसे दिल्याचा दावा करत, त्यांनी आतापर्यंत गुन्हा का दाखल झाला नाही, असा सवाल उपस्थित केला. SIT म्हणजे केवळ खेळणं असल्याचा आरोप करत, त्यांनी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तात्काळ चौकशीची मागणी केली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी मराठा आंदोलनाशी संबंधित ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहारावरून सत्ताधाऱ्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे, हे ५०० कोटी रुपये आंदोलन थांबवण्यासाठी भाजपच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे यांना देण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
राऊत यांनी आतापर्यंत या प्रकरणात गुन्हा का दाखल झाला नाही, असा सवाल उपस्थित करत सरकारची निष्क्रियता अधोरेखित केली. ते म्हणाले, “या एसआयटीचं खेळणं आम्हाला काय दाखवताय? ती धूळफेक बंद करा.” अनिल देशमुख प्रकरणात १०० कोटींच्या आरोपावरून तात्काळ कारवाई झाली, तर ५०० कोटींच्या पुराव्यासह असलेल्या आरोपावर कारवाई का नाही, असा त्यांचा सवाल होता. राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचाराविरोधातील भूमिकेची आठवण करून देत, तात्काळ चौकशीचे आदेश देण्याची मागणी केली आहे.
Published on: Oct 26, 2026 10:32 AM
SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; जरांगे प्रकरणावरून राऊतांचा....
मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
संजय राऊतांनी लिहिलं गृहमंत्री अमित शाह यांना पत्र; पत्रास कारण....
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला लांबणीवर; खटल्याची पुढील तारीख अखेर ठरली

