AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur Crime : आधी 17 व्या मजल्यावरून हात जोडून प्रार्थना, पुढच्याच क्षण धाडकन् खाली उडी… सोलापुरात काय घडलं ?

सोलापुरात धक्कादायक घटना घडली आहे. एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीचे मालक सुनील सदारंगानी (६०) यांनी इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीचा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेने सोलापूर शहर हादरले असून, त्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. सदारंगानींच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (59 शब्द)

Solapur Crime :  आधी 17 व्या मजल्यावरून हात जोडून प्रार्थना, पुढच्याच क्षण धाडकन् खाली उडी... सोलापुरात काय घडलं ?
| Updated on: Feb 06, 2026 | 2:02 PM
Share

अख्ख्या शहराला हादरवून टाकेल अशी एक भयानक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. सोलापुरात एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीच्या मालकाने आयुष्य संपवलं आहे. एका इमारतीवरून खाली उडी मारत त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. सुनील सदारंगानी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असून ते 60 वर्षांचे होते, असं समजतं. मात्र त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वीचा एका व्हिडीओ समोर आला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे. गुरूवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. सदारंगानी यांच्या मृत्यूमुळे सोलापूरकर नागरिक चांगलेच हादरले आहेत. विजापूर नाका पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. मात्र त्यांच्या जाण्यामुळे शहरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

इमारतीचा 17 वा मजला, हात जोडून प्रार्थना आणि..

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील सदारंगानी हे 60 वर्षांचे होते. एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीचे ते मालक होते. गुरूवारी दुपारी सुनील सदारंगानी हे सोलापूर शहरातल्या विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंट येथे गेले होते. तेथील जिना, पायऱ्यांच्या सहाय्याने ते या बिल्डींगच्या डायरेक्ट 17 व्या मजल्यावर गेले. तेथील भिंतीच्या कठड्यावर उभं राहून ते काही प्रार्थना करू लागले. आजूबाजूच्या स्थानिकांना, नागरिकांन हे दृश्य दिसलं आणि ते हादरलेच. काही लोकांनी त्या पनाश अपार्टमेंटच्या सुरक्षारक्षकाला या घटनेची माहिती दिली

ते ऐकून सुरक्षारक्षकांनी लगेच वर धाव घेतली आणि सुनील सदरंगानी यांच्याशी बोलून त्यांना बिल्डींगमध्ये खाली आणलं. मात्र थोड्या वेळाने सदरंगानी यांनी त्याला सांगितलं की चावी वर राहिली आहे. हाच बहाणा करून, ते पुन्हा वर गेले आणि 17 व्या मजल्यावरून खाली उडी मारून एका क्षणात त्यांनी त्यांचं आयुष्य संपवलं. उंचावरून पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकाराची नोंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

याप्रकरणी विजापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. सदारंगानी यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. मात्र त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, आत्महत्या का केली, त्यांना काही ताण, समस्या होती का या सर्व अनुषंगाने पोलीस संपूर्ण तपास करत आहेत. सदारंगानी यांच्या जाण्याने अख्खं शहर हळहळलं.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?