AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तू मला ब्लॉक का केलं? एकतर्फी प्रेमातून नृत्यांगनेवर प्राणघातक हल्ला, महाराष्ट्र हादरला!

महाराष्ट्रातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अहिल्यानगरमध्ये एक नृत्यांगनेवर एकतर्फी प्रेमातून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रात खळबळ माजली आहे.

तू मला ब्लॉक का केलं? एकतर्फी प्रेमातून नृत्यांगनेवर प्राणघातक हल्ला, महाराष्ट्र हादरला!
AhilyanagarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 09, 2026 | 12:29 PM
Share

महाराष्ट्रातील अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्ह्यातील जामखेड शहरात एक अतिशय खळबळजनक घटना घडली आहे. फोनवर बोलत नसल्याचा आणि नंबर ब्लॉक केल्याचा राग मनात धरून एका तरुणाने नृत्यांगनेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पीडिता गायत्री तुषार सावंत (वय २६) गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पीडितेची पार्श्वभूमी आणि संबंध

गायत्री सावंत (मूळ रहिवासी: वाघोली, जि. पुणे; सध्याचा पत्ता: तपनेश्वर गल्ली, जामखेड) ही नृत्यांगना म्हणून काम करते आणि तिची मैत्रीण मनिषा प्रकाश जावळे यांच्यासोबत राहते. तिची आरोपी राहुल अशोक कचरे (रहिवासी: खळेगाव, ता. गेवराई, जि. बीड) याच्याशी मागील पाच वर्षांपासून ओळख होती. २०२४ पासून मात्र दोघांमधील संबंध तुटले होते. यापूर्वीही गायत्रीने राहुलविरोधात तक्रार दाखल केली होती. पण गायत्री बोलत नसल्याच्या रागातून राहुलने धक्कादायक पाऊल उचलले.

धमकी आणि हल्ल्याची घटना

गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता राहुलने गायत्रीला फोन करून धमकी दिली होती. तो फोनवर “तू माझ्याशी बोल, माझे तुझ्यावर प्रेम आहे. बोलली नाहीस तर मारून टाकीन” अशी थेट धमकी दिली होती. राहुलचे बोलणे ऐकून गायत्रीला प्रचंड राग आला. तिने थेट राहुलचा फोन कट केला. त्यानंतर शुक्रवार, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे २ वाजता, गायत्री तिच्या खोलीत मनिषासोबत होती. मनिषा बाल्कनीत होती. त्याचवेळी राहुल इमारतीजवळ दबा धरून होता. तो हातात कोयता घेऊन थेट खोलीत घुसला आणि ओरडला, “तू माझ्याशी का बोलत नाहीस? माझा नंबर का ब्लॉक केला?” असा प्रश्न विचारला. त्यानंतर त्याने गायत्रीच्या डोक्यावर, हातावर आणि बोटांवर कोयत्याने वार केले. ती गंभीर जखमी झाली.

मैत्रीण मनिषाने आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि “मारू नको” अशी विनंती केली, पण राहुलने शिवीगाळ करत “मी तुला संपवून टाकणार” अशी धमकी देऊन घटनास्थळावरून पळ काढला.

पोलिस कारवाई

पीडित गायत्री सावंत यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात राहुल अशोक कचरेविरोधात खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder) असा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना एकतर्फी प्रेमातून घडली आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत आहेत.

Follow Us
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं
tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा