AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girija Oak: त्या निळ्या साडीचं काय केलंस? गिरीजा ओक स्पष्टच बोलली ‘त्यावर लोणच्याची बाटली..’

Girija Oak blue saree: अभिनेत्री गिरीजा ओकचा निळ्या साडीतील लूक तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतरच तिला 'नॅशनल क्रश'चा टॅग मिळाला होता. आता त्या निळ्या साडीचं काय केलंस, असा प्रश्न विचारला असता गिरीजा म्हणाली..

Girija Oak: त्या निळ्या साडीचं काय केलंस? गिरीजा ओक स्पष्टच बोलली 'त्यावर लोणच्याची बाटली..'
Girija OakImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 11, 2026 | 12:15 PM
Share

‘अशी ही बनवाबनवी’मधल्या ‘लिंबू कलर’च्या साडीनंतर जर देशभरात कोणती साडी लोकप्रिय ठरली असेल तर ती म्हणजे गिरीजा ओकची ‘निळी साडी’. याच निळ्या साडीने गिरीजाला ‘नॅशनल क्रश’चा टॅग मिळवून दिला होता. विशेष म्हणजे ही कोणती भरजरी किंवा अत्यंत महागडी नाही नव्हती. साध्या कॉटनच्या निळ्या साडीत गिरीजा ओकचं सहजसुंदर सौंदर्य खुलून दिसलं होतं. मुलाखतीची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि क्षणार्धात ‘निळ्या साडीतील’ ही अभिनेत्री कोण, अशी चर्चा सुरू झाली. आता त्या निळ्या साडीचं काय केलंस, असा प्रश्न गिरीजाला नुकत्याच एका मुलाखतीत विचारण्यात आला. यावर उत्तर देताना गिरीजा अक्षरश: पोट धरून हसली.

काय म्हणाली गिरीजा?

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत गिरीजा म्हणाली, “मी नाही सांगणार ती साडी कुठे आहे? कारण आम्ही जर सांगितलं की ती साडी कुठे आहे, तर ती सगळेच मागतील. सगळे म्हणतात की तुम्ही आमच्या प्रॉडक्ट्सची जाहिरात करा, पण ती साडी नेसून करा. माझ्या मॅनेजरने इतक्या लोकांना म्हटलंय की नाही जमणार. सगळीकडे गिरीजा फक्त निळ्या साडीतच फिरतेय. एका पॉईंटला तो माझा युनिफॉर्म झाला होता. दोन-तीन वेळा मी असंही म्हटलं होतं की तुम्ही एक काम करा, ती निळी साडी घेऊन जा आणि त्यावर प्रॉडक्ट्स ठेवून जाहिरात करा. कारण ती साडी प्रसिद्ध आहे, मी नाही. मी हवी असेन तर दुसऱ्या रंगाची साडी नेसून येते.”

हे सर्व सांगताना गिरीजाला हसू अनावर झालं होतं. याविषयी ती पुढे म्हणाली, “तुम्हाला असं वाटेल की काय बावळट लोकं आहेत. पण असंच असतं. एखादी गोष्ट चालू लागली की कोणालाच प्रयोग करायचे नसतात. जसं आहे तसंच राहू द्या, असं लोकांना वाटतं. त्यात बदल केले की सगळं ढासळून पडेल. आता गिरीजाला घ्यायचं तर ती निळी साडीच पाहिजे. काही जाहिराती मी ती साडी नेसूनच केल्या, पण त्यानंतर माझं असं झालं की, यापुढे मी हे करू शकत नाही. तुम्ही सरळ निळी साडीच घ्या, त्यात गुंडाळून लोणच्याची बाटली ठेवा. त्यामुळे ती साडी कुठे आहे, हे मी कोणालाच सांगणार नाही. पण ती साडी कोणाची आहे, हे मी नक्की सांगेन. प्रिया बापटच्या सावेंची या ब्रँडची ती साडी आहे. प्रियानेच मला ती साडी त्या मुलाखतीला नेसून जाण्यासाठी दिली होती. पण ती मुलाखत व्हायरल झाल्यानंतर जवळपास 50-60 ब्रँड्सचे मला मेसेज आले की ही आमची साडी आहे. तर संधीचा फायदा असा घ्यायचा असतो.”

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत