८०० कल्ट गाणी देणाऱ्या इंडस्ट्रीच्या एकमेव महिला संगीतकार,ज्यांनी सोनू निगम-पंकज उधासना स्टार बनवले…
आज आपण अशा एका महिला संगीतकाराबद्दल माहिती घेणार आहोत,ज्यांना तुम्ही कदाचित ओळखत नसाल, पण आयुष्यात एकदा तरी त्यांची गाणी तुम्ही नक्कीच गुणगुणली असतीलच...

मोहम्मद रफींसोबत गाणे म्हटले त्यानंतर त्या थेट संगीतकार म्हणून पुढे आल्या. पुरुष संगीतकारांचा दबादबा असणाऱ्या फिल्म इंडस्ट्रीतील एकमेव महिला संगीतकार ज्यांनी इंडस्ट्रीला ८०० कल्ट गाणी दिली. सोनू निगम आणि पंकज उधास यांना स्टार बनवले. ज्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली लता मंगेशकर, आशा भोसले आणि किशोर कुमार गायले. त्यांची अनेक गाणी तुम्ही आजही गुणगुणत असता त्या महिला संगीतकाराची कहाणी तुम्ही ऐकली आहे का ?
८०- ८५ च्या दशात रेडिओला एक गाणे सारखे वाजायचे. शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने मेरी तुम्हें चाय पे बुलाया है…’ हे ते गीत. हे यादगार गीत गायले होते. लता मंगेशकर ( Lata Mangeshkar) आणि किशोर कुमार (Kishore Kumar)यांनी. मात्र, या गाण्याचे संगीत कोणी दिले हे तुम्हाला माहिती आहे का ? त्या तडफदार संगीतकार उषा खन्ना होत. ज्यांनी आजचे आघाडीचे गायक सोनू निगम आणि पंकज उधास यांना स्टार बनवले.
हिंदी सिनेमा इंडस्ट्रीच्या त्या तिसऱ्या महिला संगीतकार आहेत ज्यांनी पुरुषांचे वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीत चार दशकांपर्यंत आपल्या संगीताची जादू चालवली. या उषा खन्ना (Usha Khanna) यांना आज तुम्ही केवळ नावाने ओळखत असाल. परंतू त्यांची संगित दिलेली गाणी तुम्ही सतत ऐकत असता. आयुष्यात एकदा तरी त्यांची गाणी तुम्ही गुणगुणली असतील…
गायक घडविणारी संगीतकार
उषा खन्ना यांनी ८०० कल्ट गाणी दिली आहे. त्यांच्या हाताखाली अनेक दिग्गज गायक गायले आहेत. त्यांनी इंडस्ट्रीला सोनू निगम (Sonu Nigam) आणि पंकज उधास (Pankaj Udhas) सारखे श्रेष्ठ गायक दिले आहेत.
गायन सोडून फूल टाईम संगीतकार
उषा खन्ना यांनी म्युझिक कंपोझर म्हणून करियर सुरु करण्याआधी त्या गायक म्हणून इंडस्ट्रीज आल्या. संगीत दिग्दर्शक ओ.पी.नय्यर यांनी उषा खन्ना यांना शशाधार मुखर्जी यांच्या ओळख करुन दिले. तेव्हा त्यांनी एक गाणे त्याना गायला दिले. जेव्हा त्यांना कळले की या गाण्याचे संगीतही उषा खन्ना यांनीच केले आहे. तेव्हा ते इतके प्रभावित झाले की त्यानी संगीतकार म्हणून त्यांनी त्यांना ‘दिल देके देखो’ चित्रपटासाठी करारबद्ध केले.
रफी साहेबांसोबत गायन
या चित्रपटात उषा खन्ना यांनी सुमारे १० गाणी बनवली आणि दोन गाणी मोहम्मद रफी सोबत स्वत: गायली.ज्यात ‘दिलरुबा, ओ मेरी नीता’ आणि ‘बोलो, बोलो, कुछ तो बोलो’ अशी गाणी होती. त्यानंतर त्यांचे नशीब चमकले. गायिकीपेक्षा त्यांची चर्चा संगीतासाठी झाली आणि त्या संगीतकार म्हणून सुपरहीट झाल्या.
उषा खन्ना यांचे करियर
६० दशकात त्यांनी त्यांच्या करियरला सुरुवात केली. आणि ७०-८० च्या दशकात त्यांना यशस्वी संगीतकार म्हणून बिरुद मिळाले. त्यांनी ९० च्या दशकातही गाणी तयार केली. सुमारे १५० चित्रपटांपैकी ८०० हून जास्त गाणी तयार केली. उषा खन्ना यांची काही प्रसिद्ध गाणी खालील प्रमाणे….
उषा खन्ना यांचा अखेरीस संगित दिलेला चित्रपट होता ‘दिल परदेसी हो गया’. हा चित्रपट फारसा चालला नाही. मात्र, त्याची सर्व गाणी हिट झाली होती.त्यानंतर त्यांनी सिनेमापासून दूर राहणे पसंद केले.
उषा खन्ना यांची काही गाजलेली गाणी
शायद मेरी शादी का ख्याल
आंख से छलका आंसू
दिल के टुकड़े, टुकड़े करके
बिन फेरे हम तेरे
तू इतनी दूर क्यों है मां
जिंदगी प्यार का गीत है
छोड़ो कल की बातें
हम तुम से जुदा हो के
मैंने रखा है मोहब्बत
तू इस तरह से मेरी जिंदगी
