लता दीदींनी गायलेले सर्वात प्रसिद्ध कॅब्रे गीत, संगीतकाराकडे लता दीदींनी ठेवल्या होत्या या दोन अटी
त्या काळात हिंदी चित्रपट सृष्टीत कॅब्रे गाणी गाणे म्हणजे तुलनेने कमीपणाचे मानले जायचे. मात्र, आशाताई भोसले आणि गीता दत्त यांनी अनेक कॅब्रे गीत गाऊन या गीतांनाही प्रसिद्धी मिळवून दिली. मात्र, लता दीदींच्या वाट्याला मोजकीच कॅब्रे गाणी आली. त्यात त्यांनी आपली छाप पाडली.

लता मंगेशकर यांच्या गाण्यांचे गारुड भारतीय मनावर कायम राहणार आहे. लता दीदींनी गायलेली प्रत्येक गाणी रसिकांच्या कायम ओठांवर असतात. साक्षात सरस्वती माता त्यांच्या वाणीत आहे असे म्हटले जाते. या लता दीदींनी कायम आपला आब राखतच गाणी स्वीकारली होती. मात्र, लता दीदींनी एका आयकॉनिक कॅब्रे साँगची ऑफर आली होती. साल १९६९ मध्ये आलेल्या ‘इंतकाम’ चित्रपटासाठी संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी त्यांना कॅब्रे गीत गाण्याचा आग्रह धरला होता. लता दीदींची लहाई बहिण आशाताईंनी अनेक उडत्या चालीची आणि कॅब्रे साँग गायिली होती. मात्र, लता यांनी अशी गाणी टाळली होती. मात्र,लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी फारच हट्ट केला. अखेर लता दीदी तयार झाल्या, परंतू त्यांनी दोन अटी घातल्या, कोणत्या त्या अटी पाहूयात….
त्या काळात हिंदी चित्रपट सृष्टीत कॅब्रे गाणे गाणे म्हणजे आशाताई भोसले आणि गीता दत्त यांच्याकडे पाहिले जात असायचे. लता दीदी या सर्वसाधारणपणे शास्रीय बाज असलेली गाणी गाण्यास प्राधान्य द्यायच्या. मात्र,गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याकडे अचानक एक कॅब्रे गीत चालून आले. हे कॅब्रे गीत म्हणजे..”आ जाने जा” हे गाणे साल १९६९ मध्ये आलेल्या ‘इंतकाम’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटासाठी सिच्युएशन एका पार्टीतील गीताची होती. लता यांच्याकडे हे गाणे आले तेव्हा त्यांनी आधी स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर लता दीदींना लक्ष्मीकांत – प्यारेलाल या संगीत द्वयींनी खूपच आग्रह धरला. त्यानंतर लता या अखेर तयार झाल्या. मात्र, त्यांनी त्यांच्याकडे दोन अटी घातल्या. पहिली अट होती. या गाण्यात कोणताही वल्गर शब्द नसावा आणि दुसरी अट होती हे गाणे पडद्यावर तुल्यबल चांगल्या कलाकारावर चित्रीत केले जावे. या अटी पाळण्यास लक्ष्मीकांत – प्यारेलाल हे एका पायावर तयार झाले.
गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले
आणि लता दीदीच्या आवाजात हे कॅब्रे साँग तयार झाले. या गाण्यात लता दीदींनी सर्व आर्तता आणि मादकता याचा संगम करत या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. “आ जाने जा” या अभिनेत्री हेलन यांच्यावर चित्रित केलेल्या गाण्याने नवा इतिहास रचला. या गीत गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी लिहीले होते. संथ सुरुवात आणि मादक लयीत सुरू होणारे हे गाणे आजही बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट कॅब्रे गाण्यांपैकी एक मानले जाते.
लता दीदींनी आपल्या कारकीर्दीत मोजकीच कॅब्रे गाणी किंवा क्लब साँग गायली आहेत. याची माहिती येथे आपण घेऊयात…
१. आ जाने जा (चित्रपट: इंतकाम – १९६९) – संगीतकार : लक्ष्मीकांत – प्यारेलाल
२. बंगले के पीछे (चित्रपट: समाधी – १९७२) – संगीतकार: आर. डी. बर्मन
३. गम छोडके मनाओ रंग (चित्रपट: गुमनाम – १९६५) – संगीतकार: शंकर-जयकिशन
४. मेरा नाम है जमीला (चित्रपट: नाईट इन लंडन – १९६७) – संगीतकार: लक्ष्मीकांत-प्यारेलाल
