AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : अफेअर, ब्रेकअपच्या चर्चा अन्…नाना पाटेकर यांच्यामुळे दोन प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये झालेला वाद, काय घडलेलं नेमकं?

Nana Patekar : नाना पाटेकर यांच्यामुळे दोन प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये वाद झाल्याच्या चर्चा होत्या. काय घडलेलं नेमकं? जाणून घ्या.

Nana Patekar : अफेअर, ब्रेकअपच्या चर्चा अन्...नाना पाटेकर यांच्यामुळे दोन प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये झालेला वाद, काय घडलेलं नेमकं?
| Updated on: Nov 10, 2026 | 10:10 PM
Share

बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या चित्रपटांइतकेच वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिले आहेत. नाना पाटेकर यांचं नाव अभिनेत्री मनीषा कोईराला आणि आयशा झुल्का यांच्यासोबत जोडलं गेलेलं. विशेष म्हणजे, नानांशी असलेल्या जवळिकीवरून या दोन्ही अभिनेत्रींच्या नात्यातही कटुता निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटानंतर या चर्चांना अधिक उधाण आलं होतं. नेमकं काय घडलं होतं? जाणून घेऊया.

आयशा झुल्का आणि नाना पाटेकर यांच्या चर्चा

९०च्या दशकात अभिनेत्री आयशा झुल्का बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. अक्षय कुमार, आमिर खान, मिथुन चक्रवर्ती यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत तिने काम केलं होतं. ‘खिलाडी’ आणि ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटांमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. अक्षय कुमारसोबत तिच्या नावाची चर्चा झाली होती. मात्र, पुढे नाना पाटेकर यांच्यासोबतच्या कथित प्रेमसंबंधांमुळेही ती चर्चेत आली. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आंच’ या चित्रपटात नाना पाटेकर आणि आयशा झुल्का यांनी एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात दोघांचे काही बोल्ड आणि इंटिमेट सीन्स होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील जवळीक वाढल्याचं वृत्त होतं. त्यावेळी नाना पाटेकर पत्नीपासून वेगळे राहत असल्याच्याही चर्चा होत्या.

मनीषा कोईरालाला आवडत नव्हती आयशा आणि नानांची मैत्री?

नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांच्या अफेअरच्या चर्चा याच काळात रंगल्या होत्या. मात्र, ‘आंच’ चित्रपटानंतर नाना आणि आयशा यांची मैत्री अधिक घट्ट झाल्याचं सांगितलं जातं. नाना आणि आयशा यांच्यातील वाढती जवळीक मनीषाला आवडत नव्हती. त्यामुळे मनीषा आणि आयशा यांच्यात वाद झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. काही काळानंतर नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांचे मार्ग वेगळे झाले. त्यानंतर नाना पाटेकर आणि आयशा झुल्का लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, काही वर्षांनी त्यांच्यातही दुरावा निर्माण झाला. यानंतर आयशा झुल्कानं बॉलिवूडपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. पुढे तिनं व्यावसायिक समीर वाशी यांच्याशी लग्न केलं.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?