Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही… ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, ‘त्या’ विधानाची सर्वत्र चर्चा
मुंबईच्या राजकारणात सध्या विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावेळी ठाकरे गाटीतल महिला नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सचिन अहिर यांच्यावर टीका केली आहे.
मुंबईच्या राजकारणात सध्या विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी टॅब खरेदीच्या निर्णयावरून सरकारवर टीका केली आहे. टॅब खरेदीसाठी करण्यात येणारा खर्च योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. इतकेच नाही तर त्यांनी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्यावरही टीका केली. सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला धक्का देत शिंदे गटाकडून उपसभापती पदासाठीचा अर्ज भरला होता. त्यानंतर त्यांनी बिनविरोध निवड झाली होती.
मुख्यमंत्र्यांकडून खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले जात असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. “मुख्यमंत्री वारंवार सांगूनही खर्चावर बंधन ठेवत नाहीत मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली सत्ताधारी दाखवत आहेत,” असेही पेडणेकर म्हणाल्या.
दरम्यान, सचिन अहिर यांच्या नगरसेवक बैठकीतील भूमिकेबाबतही पेडणेकर यांनी भाष्य केले. “सचिन अहिर यांची काम करण्याची पद्धत मला माहिती आहे… पक्षाने जी जबाबदारी दिली आहे ती ते पूर्ण करत आहेत,” असे त्यांनी सांगितले.
“ते वरळीत लढतील कि नाही माहिती नाही पण आम्ही लढून जिंकणार एवढं नक्की,” असेही किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले. ज्योती वाघमारे यांच्या वक्तव्यावरूनही त्यांनी टोला लगावला.
Published on: Aug 10, 2026 06:34 PM
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...

