AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल

संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल

| Updated on: Aug 11, 2026 | 12:09 PM
Share

गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या. या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आदिवासींच्या सुरक्षेचा आणि सरकारी शाळांमधील सुविधांचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

संजय राऊत म्हणाले, “वाघ, बिबटे, जंगली प्राणी आणि साप हे आदिवासींच्या घरात आणि शाळांमध्ये घुसून बळी घेत आहेत. तुम्ही गडचिरोलीचा नक्षलवाद संपला असे म्हणत आहात, पण आदिवासींचे मृत्यू थांबलेले नाहीत. तुम्ही आदिवासींचा कसला विकास करत आहात? त्यांना साप अथवा विंचू चावल्यावर उपचार मिळत नाहीत.”

तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूवरून सरकारच्या संवेदनशीलतेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. गडचिरोलीतील खाण उद्योगावर भाष्य करताना राऊत यांनी गेल्या वर्षभरात सुमारे 1500 आदिवासी वाहनांखाली चिरडून मृत्युमुखी पडल्याचा दावा केला. “एफआयआर नको म्हणून त्यांचे मृतदेहसुद्धा गायब केले जातात,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

Published on: Aug 11, 2026 12:09 PM

Follow Us