AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?

मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?

| Updated on: Aug 11, 2026 | 10:14 AM
Share

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर होणार आहे.

यापूर्वी ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी केलेल्या जोरदार युक्तिवादानंतर आजच्या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावरील अधिकाराच्या या कायदेशीर लढाईत आज न्यायालयात नेमके कोणते मुद्दे मांडले जातात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

आजच्या सुनावणीत न्यायालयाकडून काय निरीक्षण नोंदवलं जातं किंवा पुढील सुनावणीबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे दोन्ही गटांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या या बहुचर्चित प्रकरणात आज नेमकं काय घडतं आणि न्यायालयाचा कल काय राहतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: Aug 11, 2026 10:14 AM

Follow Us