AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!

Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!

| Updated on: Aug 11, 2026 | 11:45 AM
Share

दिल्लीच्या जंतर-मंतरवर झालेल्या जेन-झी आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद देशभर उमटले होते. विद्यार्थी आंदोलनामुळे केंद्र सरकारवरही दबाव निर्माण झाला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा मुद्दाही चर्चेत आला होता. त्यानंतर आता जेन-झी पिढीला आपल्या बाजूने वळवण्यासाठी राजकीय पक्षांकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत तरुणांशी संवाद साधत आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. आता भाजपच्या स्थानिक नेत्या आणि नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनीही जेन-झी आणि जेन-अल्फा पिढीसाठी महत्त्वाची मागणी केली आहे.

कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईच्या लोकलमध्ये 12 पैकी 3 डबे राखीव ठेवावेत, अशी मागणी तेजस्वी घोसाळकर यांनी केली आहे. हे तीन डबे पहाटे 5 ते सकाळी 11 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात तेजस्वी घोसाळकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या कॉलेज विद्यार्थ्यांसाठी लोकलमधील तीन डबे राखीव ठेवावेत, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.

मुंबईतील लोकल प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांना होणारी गर्दी आणि गैरसोय लक्षात घेऊन ही मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता रेल्वे मंत्रालय या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे मुंबईतील विद्यार्थी आणि प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 11, 2026 11:45 AM

Follow Us