कानाला साप चावला, बेड असते तर… पालकांचा संताप; प्रशासनाचे तातडीचे चौकशीचे आदेश; ग्राऊंड रिपोर्ट काय?
गडचिरोतील एका आश्रम शाळेतील तीन विद्यार्थीनींचा सर्प दंशामुळे मृत्यू झाला आहे. तर एका विद्यार्थीनीची परिस्थिती गंभीर आहे. आता पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

गडचिरोली येथील धानोरा तालुक्यातील जपतलाईत आश्रम शाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. रात्री विद्यार्थिनी खोलीत झोपलेल्या असताना सापाने दंश केल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत तीनही विद्यार्थिनींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर एका विद्यार्थीवर उपचार सुरु आहेत. शासनाकडून आश्रमशाळेतील घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. आदिवासी विकास आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच आता कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे.
नेमकं काय घडलं?
धानोरा तालुक्यातील जपातलाई येथील आश्रम शाळेत 233 विद्यार्थिनी मुली शिक्षण घेत आहेत. परंतु या विद्यार्थिनींना एकच खोलीत निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे. या आश्रम शाळेत खाटा उपलब्धता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना फरशीवर खाली झोपावं लागत आहे. अशात काल रात्री दोन वाजता या आश्रम शाळेच्या रूममध्ये दांडे कारेडा नामक विषारी साप शिरला. हा विषारी साप चार विद्यार्थीनींना चावला. हे प्रकरण समोर येतात या सर्व वस्तीगृहातील मुलींनी वस्तीगृहात काम करणाऱ्या बाईला सांगितले.
त्यानंतर एक तासानंतर येथील शिक्षक शाळेत आले व त्या विद्यार्थिनींना उपचारासाठी नेण्यात आले. उपचाराला उशिरा झाल्यामुळे तीन मुलींचा जीव गेला. या आश्रम शाळेत तीन महिन्यांपूर्वीही एक विषारी साप स्टोर रूममध्ये निघाला होता. त्यावेळी शिक्षकांनी काळजी घेतली असती तर या तीन मुलींचे जीव आज गेला नसता. परंतु शिक्षकांच्या दुर्लक्षतेमुळे निवासी वस्तीगृहाच्या खिडक्या खुल्या राहिल्या राहिल्या आणि साप वस्तीगृहात शिरला. चार मुलींना या विषारी सापाने दंश केला.
पालकांनी व्यक्त केला संताप
जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना गडचिरोली जिल्ह्यात घडली. जपतलाई पासून गडचिरोली पर्यंत रस्ता बरोबर नसल्यामुळे उपचारासाठी उशिरा झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अखेर या घटनेला जबाबदार कोण? शिक्षकांना वार्डांना निलंबित करण्यात यावे आणि शाळा पूर्णपणे बंद करण्यात यावी अशी मागणी ही पालकांनी केलेली आहे.
गडचीरोली जिल्ह्यातील त्या आश्रमशाळेत विद्यार्थीनींना झोपण्यासाठी बेड असते तर कदाचित सर्रदंशाची घटना टळली असती. कोट्यवधीचा निधी मिळूनंही विद्यार्थ्यांना खाली झोपवलं जातं, ही धक्कादायक बाब आहे. आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना खाली झोपावं लागतं, ही धक्कादायक बाब आहे. नागपूरातील मेडीकल कॉलेजमध्ये दिपीका मडावी या विद्यार्थिनीवर उपचार सुरु आहे. ती अद्यापंही धोक्याबाहेर नाही, असं दिपीकासोबत आलेले शिक्षक अनिल सहारे यांनी सांगितले आहे.
ज्या मुलीवर उपचार सुरु आहेत तिला नागपूरमध्ये हलवण्यात आले आहे. डॉक्टरांनी सांगितले की, दिपीका मडावीवर नागपूरातील मेडीकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. काल दिपीका मडावीची प्रकृती खालावल्याने तिला नागपुरात एअरलिफ्ट करण्यात आलंय. सध्या नागपूर मेडीकल कॅालेजमधील तज्ज्ञ डॅाक्टर तिच्यावर उपचार करत आहेत.
आदिवासी विकास आयुक्तांना चौकशीचे आदेश
शासनाकडून आश्रमशाळेतील घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. आदिवासी विकास आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच आता कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित आश्रमशाळा ही मारोतराव कोवासे या कॉंग्रेसच्या माजी खासदाराची आहे. मुलगा विश्वजित कोवासे हा काँग्रेसचा विद्यमान जिल्हाध्यक्ष आहे. प्रशासनाकडून या गंभीर घटनेचा तपास सुरु आहे. इतर तीन मुलींवर उपचार सुरु आहेत तर एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
