विरोधकांना सुबुद्धी येवो आणि कुबुद्धीचे विसर्जन होवो, देवेंद्र फडणवीस यांचे बाप्पाला मागणे
मुंबई आणि पुण्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणूका शिस्तीने सुरु आहेत. गिरगाव चौपाटीवर गणेशमूर्तींचा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी विरोधकांना बाप्पा सुबुद्धी देवो आणि कुबुद्धीचे विसर्जन होवो असा आशीवार्द बाप्पाकडे मागितल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई आणि पुण्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणूका शिस्तीने सुरु आहेत. भक्तांचा दहा दिवसांचा पाहुचार घेऊन बाप्पा आपल्या गावाला निघाले आहेत. गिरगाव चौपाटीवर गणेशमूर्तींचा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुंबईच्या महापौर रितू तावडे उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना बाप्पा सुबुद्धी देवो आणि कुबुद्धीचे विसर्जन होवो असा आशीवार्द मागितल्याचे प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, प्रचंड उत्साह दिसत आहे. उत्साहाने भरलेली गर्दी पाहायळा मिळत आहे. दहा दिवस भक्तीभावनेने गणरायला पुजले आज त्यांच्या विसर्जनाचा दिवस. दहा दिवस कसे गेले हे समजत नाही. एकीकडे एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात दु:ख असे दृश्य असते. पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती आपण करीत असतो.
विरोधकांना सुबुद्धी यावी
मुंबईत अत्यंत शित्सबद्ध मिरवणूका सुरु आहेत. पुण्यात सर्वात जास्त वेळा मिरवणूका चालतात. अत्यंत शांतपणे या मिरवणूका होत आहेत. गणेश उत्सव हा आनंद पर्व आहे. नागरिकांना सुरक्षितपणे, शिस्तबद्धपणे सहभागी व्हावे. मुंबई महानगर पालिका आणि मुंबईतील पोलिस योग्य प्रकारे नियोजित करत आहे.त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. महापालिकेने देखील चांगली व्यवस्था केली आहे. दरवर्षी येथे काही ना काही नवीन पाहायला मिळते. विरोधकांना सुबुद्धी यावी आणि कुबुद्धीचे विसर्जन व्हावे अशी मागणी यावेळी आपण बाप्पाला करतो असे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
बळीराजाच्या मागे सरकार खंबीरपणे उभे
गणेश भक्तांचा गर्दीचा पूर असला तरी अगदी शिस्तीने गणपती बाप्पाचे विसर्जन होत आहे. या क्षणी आनंद एका डोळ्यात तर दुसऱ्या डोळ्यात दु:ख असते. लाखो गणेश भक्त हा सोहळा पाहात आहेत. आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला त्रास होणार नाही अशी गणेश मंडळे काळजी घेत आहेत. लाखो लोक या विसर्जन मिरवणूकीत येत असतात. मुंबई, पुण्यात शिस्तबद्ध पद्धतीने हा सोहळा होत असतो. मी महानगर पालिका, मुंबई पोलिस आणि वाहतूक पोलिस यांचे आभार मानतो असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे. बळीराजाच्या मागे सरकार खंबीरपणे उभे राहिले आहे. आणि यापुढे राहणार असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
