दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
दिवाळीच्या सुट्ट्या आणि जोडून आलेले वीकेंड यामुळे कोकणातील समुद्रकिनारे सध्या पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. सिंधुदुर्गपासून रायगडपर्यंतच्या सर्वच किनारपट्ट्यांवर सध्या पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, मुरुड, कर्दे आणि लाडघर या किनाऱ्यांना पर्यटकांची विशेष पसंती मिळत आहे.
दिवाळीच्या सुट्ट्या आणि जोडून आलेले वीकेंड यामुळे कोकणातील समुद्रकिनारे सध्या पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. सिंधुदुर्गपासून रायगडपर्यंतच्या सर्वच किनारपट्ट्यांवर सध्या पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, मुरुड, कर्दे आणि लाडघर या किनाऱ्यांना पर्यटकांची विशेष पसंती मिळत आहे. ब्ल्यू फ्लॅगचा आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाल्यानंतर लाडघर समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटनात सुमारे 30% वाढ झाली आहे.
मुंबई, पुणे, नागपूर तसेच पश्चिम महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरातसारख्या दूरच्या भागांतूनही मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. कोकणातील हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि लॉजिंग पूर्णपणे हाऊसफुल्ल झाली आहेत. पर्यटक निळ्याशार समुद्रात मनसोक्त डुंबण्याचा तसेच समुद्रातील साहसी खेळांचा आनंद लुटत आहेत. पुढील दोन दिवस अशीच गर्दी कायम राहील, असा अंदाज आहे.
Published on: Nov 14, 2026 04:26 PM
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..

