AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sankarshan Karhade : मी मरेपर्यंत…संकर्षण कऱ्हाडेनं केलेली आजोबांच्या पैशांची चोरी; सांगितला किस्सा

Sankarshan Karhade : संकर्षण कऱ्हाडेनं एका मुलाखतीत त्याच्या बालपणीचा किस्सा सांगितला आहे. अभिनेत्यानं आजोबांच्या पैशांची चोरी केलेली.

Sankarshan Karhade : मी मरेपर्यंत...संकर्षण कऱ्हाडेनं केलेली आजोबांच्या पैशांची चोरी; सांगितला किस्सा
| Updated on: Nov 14, 2026 | 7:51 PM
Share

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आपल्या अभिनयासोबतच विनोदी स्वभावासाठीही ओळखला जातो. नाटक, मालिका, चित्रपट आणि सूत्रसंचालन अशा विविध माध्यमांतून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. संकर्षण अनेकदा मुलाखतींमधून आपल्या आयुष्यातील मजेशीर आठवणी आणि किस्से सांगत असतो. असाच एक भन्नाट किस्सा त्याने बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना सांगितला होता. विशेष म्हणजे, या किस्स्यात त्यानं वडिलांच्या एटीएममधून केलेल्या ३०० रुपयांच्या चोरीची आठवण सांगितली आहे.

संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा

संकर्षण कऱ्हाडे म्हणाला की, ‘नवीन नवीन एटीएम कार्ड आलं होतं. वडिलांच्या एटीएमचा पासवर्ड अख्या घरात फक्त मला माहित होता. म्हणजे बाबांना सुद्धा नाही मला माहित होता. नागपंचमीला माझे आजोबा माझ्या आईला हमखास साडी घ्यायचे. माझे आजोबा मला म्हणाले, मन्या जरा एटीएमला जा पैसे घेऊन ये. म्हटलं किती काढायचेत आजोबा? तर ते म्हणाले 500 काढ. मी म्हटलं ओके. मी गेलो एटीएममध्ये कार्ड घातलं. म्हटलं हीच ती संधी आहे. मी 300 काढले रिसिप्ट फाडून टाकली. 300 खिशात ठेवले. 500 काढले 500 ची रिसिप्ट घेतली घरी आलो. आजोबा 500 रुपये काढले. त्यांनी उषाला ठेवून दिले. मी म्हटलं चोरी मिटली. विषय संपला.’

‘संध्याकाळी बाबा आले घरी. बाबा आजोबांना म्हणाले, ‘बाबा तुम्ही आज 800 कसं काय काढले?’ हे ऐकल्यावर मला जो घाम फुटला होता. तो 300 चा घाम मी माझ्या मरेपर्यंत विसरू शकत नाही. मी ग्रॅज्युएशनला सुद्धा नव्हतो, मी अकरावी बारावीत असेन. आजोबा म्हणाले, नाही हो गिरीशराव, माझ्या बाबांना ते अहो जाओ म्हणायचे. त्यांना लक्षात आलं. ते बाबांना म्हणाले बरोबर आहे. तुम्ही जा आता, हात पाय धुऊन घ्या.’

‘बाबा आत गेल्यावर आजोबांनी अत्यंत घाणेरड्या शिवीनी मला हाक मारली, मला कळलं हे माझ्यासाठी आहे म्हणून. मग मी त्यांच्या जवळ गेलो. मला म्हणाले, साहेब 300 कुठे आहेत? म्हटलं, मी उडवले.मला म्हणले हरकत नाही. फक्त एटीएम मधून चोरी करताना आपला बाप त्याच बँकेमध्ये मॅनेजर आहे याच तर भान ठेवावा. माझे वडील त्याच बँकेत मॅनेजर. एवढी तर अक्कल कुठं, कशाचंच भान नव्हतं. ते म्हणाले, तुझेच पैसे आहेत तू 300 नाही 3000 काढ.’ न्यूज 18ला दिलेल्या मुलाखतीत संकर्षण कऱ्हाडे बोलत होता.

Follow Us
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?