Vastu Shastra : तुम्हालाही घरात जुने कपडे साठवून ठेवण्याची सवय आहे? मग या चुका टाळाच, अन्यथा व्हाल बरबाद
अनेकांना आपल्या घरात वर्षानुवर्ष वापरात नसलेले, फाटलेले किंवा वयानुसार लहान झालेले कपडे तसेच साठवून ठेवण्याची सवय असते, वास्तुशास्त्रामध्ये मात्र अशा पद्धतीने कपडे साठवून ठेवण्याच्या सवयीला अशुभ माण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्वाचं माण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशा काही चुका करतो, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होऊन नकारात्मक ऊर्जा तयार होते. यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, जसं की हातात पैसा न टिकणं, खर्चामध्ये अचानक मोठी वाढ होणं, काहीही कारण नसताना घरात सतत भांडणं होणं, या सारख्या समस्या तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार अनेकजण अशीच एक मोठी चूक करत असतात, ती म्हणजे अनेकजण वर्षानुवर्ष आपले जुने कपडे तसेच घराच्या कपाटामध्ये साठवून ठेवतात. परंतु घरात कधीही जुने झालेले, वापरतात नसलेले किंवा फाटलेले कपडे साठवून ठेवू नये, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. आज आपण जर जुने कपडे घरात साठवून ठेवायचे असतील तर काय कळजी घ्यावी? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
काय काळजी घ्यावी – अनेकांना आपले जुने झालेले कपडे घरातच साठवून ठेवण्याची सवय असते, अनेक घरात अशा जुन्या कपड्यांचा ढिग जमा होतो. मात्र या पद्धतीने कपडे साठवून ठेवल्यास त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. जर तुम्हाला जुने कपडे साठवून ठेवायचेच असतील तर ते कपडे कुठेही फाटलेले किंवा जीर्ण झालेले नसावेत, याची काळजी घ्यावी. जे फाटलेले कपडे आहेत, ते कधीही साठवून ठेवू नये, त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
जे फाटलेले कपडे असतात ते तुमच्या घरात शनी आणि राहू दोष निर्माण करतात, त्यामुळे तुमच्या आयुष्यात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे घरात कधीही फाटलेले कपडे साठवून ठेवू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं. समजा तुम्हाला जर तुमचे जुने कपडे साठवून ठेवायचेच असतील तर ते नीट व्यवस्थित घड्या घालून कपाटात ठेवाव्येत असे कपडे ठेवण्याची दिशा एक तर पश्चिम असावी, किंवा दक्षिण असावी. कधीही घराच्या बेडखाली अशा पद्धतीने जुने कपडे साठवून ठेवू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
