AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Antarctica Ice Ganpati : चक्क बर्फापासून बनवला गणपती! अंटार्क्टिकातील भारतीय वैज्ञानिकांचा अनोखा गणेशोत्सव

भारतापासून सुमारे १५ हजार किलोमीटर दूर असलेल्या अंटार्क्टिकातील मैत्री संशोधन केंद्रावर भारतीय वैज्ञानिकांनी बर्फापासून गणेशमूर्ती तयार करून गणेशोत्सव साजरा केला. पूजा, आरती आणि मोदकांच्या नैवेद्यासोबत या उत्सवाचा VIDEO सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

Antarctica Ice Ganpati : चक्क बर्फापासून बनवला गणपती! अंटार्क्टिकातील भारतीय वैज्ञानिकांचा अनोखा गणेशोत्सव
antartica snow bappa Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 25, 2026 | 8:39 PM
Share

गणपती बाप्पा मोरया… ही हाक भारतापासून तब्बल १५ हजार किमी दूर अंटार्टिका मध्येही घुमली. घरापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या भारतीय वैज्ञानिकांनी बर्फापासून चक्क बाप्पाची मूर्ती साकारली आहे. बर्फाच्या या अनोख्या बाप्पाचं विसर्जनही करण्यात आलं. सोशल मीडियावर या खास क्षणाचा व्हिडिओ व्हायरल होत असून एवढ्या दूर असूनही भारतीयांची बाप्पाावरील श्रद्धा आणि आपल्या संस्कृतीशी असलेलं नातं पाहून अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

अंटार्क्टिकामध्ये बर्फाचं साम्राज्य… आजूबाजूला नजर जाईल तिथपर्यंत फक्त पांढराशुभ्र बर्फ आणि भारतापासून हजारो किलोमीटर अंतर. याच अंटार्क्टिकाच्या धर्तीवर मैत्री संशोधन केंद्राच्या भारतीय वैज्ञानिकांनी बर्फाच्या गणेशमूर्तिची स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला आहे.

इतर काही सोईसुविधा नसल्याने जवळ असलेल्या भरपूर बर्फाचा फायदा घेत वैज्ञानिकांनी त्यापासून गणेशमूर्ती साकारली. या मूर्तीसमोर वैज्ञानिकांनी गणेशोत्सवाचे विधी देखील केले. या अनोख्या उत्सवामुळे बर्फाळ वातावरणातही भारतीय सणाचा उत्साह पाहायला मिळाला.

पू़जा, मोदक आणि बाप्पाचा जयघोष

गणपतीची मूर्ती सााकरल्यानंतर वैज्ञानिकांनी बाप्पाची पूजा केली . यावेळी मोदकांचाही नैवेद्य बाप्पााला अर्पण करण्यात आला. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

बाप्पााला अनोख्या पद्धतीने निरोप

गणेशोत्सवाच्या शेवटी बर्फापासून तयार केलेल्या बाप्पाचं विसर्जनही करण्यात आलं. अंटार्क्टिकाच्या बर्फाळ वातावरणात झालेलं हे अनोख विसर्जन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय वैज्ञानिकांचा उत्साह आणि बाप्पााविषयीची श्रद्धा पाहायला मिळत आहे.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत