AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने पुणं दुमदुमलं; मानाच्या पाचही गणपतींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन

अनंत चतुर्दशीला पुण्यात गणेश विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या गजरात पुणेकरांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. कसबा, तांबडी जोगेश्वरी या मानाच्या गणपतींसह सर्व मंडळांच्या मूर्तींचे ढोल-ताशांच्या गजरात, शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन झाले. भाविकांच्या डोळ्यात आसवं होती, पण पुढच्या वर्षाची आसही होती.

Pune :  ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने पुणं दुमदुमलं; मानाच्या पाचही गणपतींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन
| Updated on: Sep 25, 2026 | 9:13 PM
Share

‘निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी; चुकले आमचे काही, तर क्षमा असावी!’ एका डोळ्यात अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात पुढच्या वर्षी बाप्पाच्या आगमनाची आस… मुखी गणरायाचा जयघोष करत आज राज्यभरातील भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. गेल्या दहा दिवसांपासून उत्साह, आनंद आणि भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी सांगता झाली. मुंबई, पुण्यासह राज्यभरात आज गणेश विसर्जनाच्या मिरवणुका उत्साहात पार पडल्या. पुण्यातही सकाळपासूनच विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. शहराची ओळख आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन उत्साहपूर्ण वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आलं. ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात पुणेकरांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.

सकाळपासूनच विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेला केसरीवाडा गणपती, या पाचही मानाच्या गणपतींच्या मूर्तींचे आज विसर्जन करण्यात आले. सकाळपासूनच पुण्याच्या रस्त्यांवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बाप्पाला निरोप देण्याचा उत्साह होता. मात्र, विसर्जनाची वेळ जवळ येताच अनेक भाविकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

कसबा गणपतीची सहा तासांची मिरवणूक

पुण्यातील महात्मा फुले मंडई येथून सकाळी 9.45 वाजता कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. सकाळी 10.28 वाजता मिरवणूक बेलबाग चौकात दाखल झाली. त्यानंतर सायंकाळी 4.40 वाजता गणपतीचे विसर्जन करण्यात आले. तब्बल सहा तास चाललेल्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.

तांबडी जोगेश्वरी गणपतीला भावपूर्ण निरोप

तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी 10 वाजता सुरुवात झाली. ढोल-ताशांचा गजर, झांजांचा खणखणाट आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात भाविक मिरवणुकीसोबत मार्गस्थ झाले. सकाळी सुमारे 11.25 वाजता मिरवणूक बेलबाग चौकात पोहोचली. तब्बल सात तास 15 मिनिटांच्या मिरवणुकीनंतर सायंकाळी 5 वाजता तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

गुरुजी तालीम गणपतीचीही उत्साहात मिरवणूक

गुरुजी तालीम गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी 10.15 वाजता मंडई येथून सुरुवात झाली. सकाळी 11.27 वाजता मिरवणूक बेलबाग चौकात दाखल झाली. सुमारे सात तास 20 मिनिटे चाललेल्या मिरवणुकीनंतर सायंकाळी 5.05 वाजता गणरायाचे विसर्जन करण्यात आले.

तुळशीबाग गणपतीचेही विसर्जन

पुण्यातील चौथा मानाचा गणपती असलेल्या तुळशीबाग गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी 10.45 वाजता सुरुवात झाली. दुपारी 1.54 वाजता मिरवणूक बेलबाग चौकात पोहोचली. त्यानंतर सायंकाळी 5.34 वाजता बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.

केसरीवाडा गणपतीला पारंपरिक लवाजम्यात निरोप

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या केसरीवाडा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी सव्वा अकरा वाजता सुरुवात झाली. पारंपरिक लवाजमा आणि ढोल-ताशांच्या गजरात निघालेली ही मिरवणूक दुपारी 3 वाजता बेलबाग चौकात पोहोचली. त्यानंतर सायंकाळी 6.15 वाजता केसरीवाडा गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप

पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण असलेल्या पारंपरिक ढोल-ताशा पथकांनी वातावरणात उत्साह निर्माण केला. ध्वजधारकांचे प्रात्यक्षिक, टाळ-मृदंगाचा निनाद आणि गुलालाची उधळण यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने पुण्याचे रस्ते दुमदुमून गेले. पाचही मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका नियोजित वेळेत आणि सुरळीत पार पडल्याने प्रशासनासह नागरिकांनीही समाधान व्यक्त केले.

बाप्पाला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते; मात्र पुढच्या वर्षी गणरायाच्या आगमनाची उत्सुकताही तितकीच होती. बाप्पा आज आपल्या गावाला गेले असले तरी त्यांच्या आगमनाच्या आठवणी आणि आशीर्वाद पुणेकरांच्या मनात कायम राहतील. आता प्रतीक्षा आहे ती पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची !

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत