AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाप्पा मोरया

बाप्पा मोरया

गणेशोत्सव हा भारतातील एक प्रमुख उत्सव आहे. खासकरून महाराष्ट्रात हा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांमध्येही गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. 19व्या शतकात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी हा उत्सव सुरू केला. त्याला सार्वजनिक गणेशोत्सवाचं रुप दिलं. या उत्सवाच्या माध्यमातून भारतीयांना एकत्र करण्याचा या मागचा उपयोग होता. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात नागरिकांना एकत्र करण्याची गरज होती. त्यातूनच गणेशोत्सवाची संकल्पना पुढे आली. गणेशोत्सवाचा सोहळा तब्बल दहा दिवस चालतो. दीड, पाच, सात आणि 10 व्या दिवशी गणेशाचं विजर्सन केलं जातं.

Read More

पोलिसांच्या बाप्पाचं विसर्जन; सामाजिक संदेश देणारी अनोखी मिरवणूक

मेहकर शहरातील सार्वजनिक गणेश विसर्जन उत्साहात आणि शांततेत पार पडले. त्यानंतर पोलीस वसाहतमधील पोलिस कर्मचाऱ्यांनी बसवलेल्या गणपतीचे विसर्जन करताना सामाजिक संदेश देणारे फलक हातात घेऊन गणरायाची मिरवणूक काढण्यात आली.

Video: लाडक्या बाप्पाला निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर

काल गणेश राज्यभरात सर्वत्र गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. अशातच आता एक व्हिडिओ समोर आला आहे. यात गणपती बाप्पााला निरोप देताना एक चिमुकली भावूक झाल्याचे दिसत आहे. तिच्या डोळ्यात पाणी आले होते.

PHOTO: ‘पुढच्या वर्षी लवकर या’ भाविकांनी लालबागच्या राजाला दिला निरोप, अरबी समुद्रात विसर्जन

PHOTO: ‘पुढच्या वर्षी लवकर या’ भाविकांनी लालबागच्या राजाला दिला निरोप, अरबी समुद्रात विसर्जन

मुंबईतील सर्वात लोकप्रिय लालबागचा राजाचे अरबी समुद्रात विसर्जन झाले आहे. आज सकाळी समुद्राला भरती आल्यामुळे विसर्जनाला उशिर झाला होता मात्र आता विसर्जन झाले आहे. याचे काही फोटो समोर आले आहेत.

करमाळा शहरात हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन; विसर्जनावेळी मुस्लिम बांधवाकडून बाप्पावर पुष्पवृष्टी

करमाळा शहरात हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन पाहायला मिळाले आहे. गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीवर मुस्लिम बांधवाकडून जामा मशिदीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. ही प्रथा मागील 39 वर्षांपासून सुरु असून यंदाचे 40 वं वर्ष आहे. तसेच प्रत्येक गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा शाल ,फेटा, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

नंदुरबारमधील दादा आणि बाबा या दोन्ही गणरायांचे विसर्जन

नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच गणेश मंडळांच्या वतीने आपल्या लाडक्या बापाचे विसर्जन मिरवणूक संपल्या आहेत. नंदुरबार शहरातील प्रथम आणि द्वितीय मानाचे दादा आणि बाबा गणपतीची हरिहर भेट झाली हरिहर भेटीनंतर जिल्ह्यातील सर्वच गणेश विसर्जन होत असतं, या हरिहर भेट पाहण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यासह शेजारील असलेल्या गुजराती, मध्य प्रदेश राज्यातून गणेश भक्त मोठे संख्येने येत असतात. विसर्जनानंतर दोन्ही मानाच्या गणरायांची आरती होत असतें

लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर लोटला लाखोंचा जनसागर

लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर लोटला लाखोंचा जनसागर

लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची प्रचंड गर्दी केली आहे. तब्बल 22 तासांनंतर लालबागचा राजा चौपाटीवर पोहोचला आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोहोचली.

बाप्पाला निरोप देताना धाय मोकलून रडली चिमुकली

दहा दिवस गणरायाची मनोभावे पूजा, आरती केल्यानंतर अखेर बाप्पाला निरोप द्यावा लागतो. मात्र बाप्पाला निरोप देताना अनेकांना असह्य वेदना होत असतात. अशातच बाप्पाला निरोप देत असताना एक चिमुकली धाय मोकलून रडत असल्याचं दिसून आले आहे. अमरावतीच्या विद्यापीठ परिसरातील दत्तविहार कॉलनीतील श्रीजा थोरात हिचा हा व्हिडिओ असून सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गोंदियात भाविकांनी गणपती बाप्पााला दिला निरोप

"गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या" असा जयघोष करत गणपती बाप्पाला गोंदियात निरोप देण्यात आला. गोंदियातील घरगुती गणपती मूर्तींच्या विसर्जनासाठी गोंदिया शहरात अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होत.

भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरातील श्री गणेशाचे विसर्जन

सोलापुरातील भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरातील श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आलं. सिद्धेश्वर तलावातील विष्णू घाट येथे बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र डॉ. किरण देशमुख, नात क्रीशा आणि नातू विधार्थ आदी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

प्रत्येक गणपती विसर्जन मिरवणुकीत तो तुफान नाचायचा; लक्ष्याचा गिरगावातील हा किस्सा माहीत आहे का?

प्रत्येक गणपती विसर्जन मिरवणुकीत तो तुफान नाचायचा; लक्ष्याचा गिरगावातील हा किस्सा माहीत आहे का?

लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक महान अभिनेते होते. ज्येष्ठ सिने समीक्षक दिलीप ठाकूर यांनी लक्ष्मीकांत बेर्डे हे गणपती विसर्जन मिरवणूक तुफान डान्स करायचे याबाबतची आठवण सांगितली आहे.

मुंबईचा राजा…! असं म्हणताच रोहित शर्माने चाहत्यांना केली विनवणी, काय झालं पाहा व्हायरल Video

मुंबईचा राजा…! असं म्हणताच रोहित शर्माने चाहत्यांना केली विनवणी, काय झालं पाहा व्हायरल Video

टीम इंडियाच्या वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रोहित शर्मा चाहत्यांना विनवणी करताना दिसत आहे. मुंबई राजा रोहित शर्मा... या घोषणेनंतर त्याने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.

लालबागच्या चरणी बिग बींचे लाखोंचे दान, चाहते म्हणाले पंजाबला मदत करा

लालबागच्या चरणी बिग बींचे लाखोंचे दान, चाहते म्हणाले पंजाबला मदत करा

पंजाबच्या पुरस्थितीने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याचा फटका बॉलीवूड हस्तींनाही बसत आहे. किंग खान शाहरुख या ट्रोल केल्यानंतर आता लालबागचा राजाला दान करणाऱ्या दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही चाहत्यांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.