AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाटो प्रमुख कीव्हला पोहचले असतानाच रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, 450 ड्रोन आणि 70 क्षेपणास्रे डागली

रशियाने युक्रेनवर या वर्षातला आता पर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात सुमारे ४५० ड्रोन आणि ७० मिसाईल डागण्यात आल्या आहेत. वीज केंद्रांना टार्गेट करण्यासाठी हा हल्ला झाला असीन अनेक शहरातील वीज आणि हिटर यंत्रणा ठप्प झाल्याने कडाक्याच्या थंडी नागरिकांचे हाल सुरु आहेत.

नाटो प्रमुख कीव्हला पोहचले असतानाच रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, 450 ड्रोन आणि 70 क्षेपणास्रे डागली
Russian drone strike
| Updated on: Feb 04, 2026 | 2:22 AM
Share

रशियाने युक्रेनवर या वर्षीचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. युक्रेन राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांच्या मते रशियाने एकाच रात्री सुमारे ४५० लाबपल्ल्याचे ड्रोन आणि ७० हून वेगवेगळ्या मिसाईल डागल्या आहेत. यात ३२ बॅलेस्टीक मिसाईलचा देखील समावेश होता. जी आतापर्यंतची सर्वाधिक संख्या सांगितली जा आहे. हा हल्ला युक्रेनच्या किमान पाच भागात केला आहे. कडाक्याच्या थंडी वीज केंद्रांना लक्ष्य करण्यात आल्याने नागरिकांचे हाल सुरु असून युक्रेनने नाटोकडे सैन्य मदत मागितली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात किमान १० लोक जखमी झाले आहेत. हा हल्ला अशा वेळी झाला आहे ज्या वेळी नाटोचे महासचिव मार्क रुटे युक्रेनची राजधानी कीव्ह येथे पोहचले होते. याशिवाय रशिया आणि युक्रेनचे युद्ध समाप्तकरण्यासंदर्भात अमेरिकेच्या मध्यस्थीखाली अबूधाबीत चर्चा होणार होती. काही तासाआधी २८ क्रुझ आणि ४३ बॅलेस्टिक मिसाईल डागण्यात आल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

युक्रेनमधील तापमान उणे २० अंश सेल्सियस

कडाक्याच्या थंडीत लोकांना त्रास देण्यासाठी रशिया जाणूनबुजून युक्रेनच्या वीज यंत्रणेला लक्ष्य करीत आहे.रशिया लोकांना वीज, हीटिंग आणि पाणी यासारख्या आवश्यक सेवांपासून वंचित ठेवू इच्छित आहे असा आरोप झेलेन्स्की यांनी केला आहे. युक्रेनची खाजगी वीज कंपनी डीटीईकेने म्हटले आहे की, यावर्षी वीज यंत्रणेवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला होता. हल्ल्याच्या वेळी कीवमधील तापमान उणे २० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते आणि दुसऱ्या दिवशी तापमान उणे १६ अंशांवर होते.

या हल्ल्यामुळे कीवमधील अनेक निवासी भागात आग लागली. एक बालवाडी आणि एक पेट्रोल पंप देखील जळाला. राजधानीत किमान पाच लोक जखमी झाले. कीवचे महापौर विटाली क्लित्स्को यांनी सांगितले की, सकाळपर्यंत शहरातील १,१७० अपार्टमेंट इमारतींमध्ये हीटिंग बंद करण्यात आली होती. यामुळे वीज आणि हीटिंग दुरुस्तीचे कामही बाधित झाले.

नाटो मदत करत राहील: रुट्टे

रशियाने खार्किव्ह आणि ओडेसा या युक्रेनियन प्रदेशांवरही हल्ला केला आहे. याव्यतिरिक्त, कीवमधील दुसऱ्या महायुद्ध राष्ट्रीय संग्रहालयातील हॉल ऑफ फेमचे नुकसान झाले. नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांनी युक्रेनच्या संसदेत सांगितले की, नाटो देश युक्रेनला मदत करत राहतील. गेल्या वर्षापासून, नाटो देशांनी युक्रेनला आवश्यक असलेल्या ७५% क्षेपणास्त्रांचा आणि ९०% हवाई संरक्षण प्रणालींचा पुरवठा केला आहे. झेलेन्स्की यांनी मित्र राष्ट्रांना अधिक हवाई संरक्षण प्रणाली पाठवण्याचे आवाहन केले.

Follow Us
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...