AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी विहीर दुर्घटना! जिल्हाधिकाऱ्यांचे थेट चाैकशीचे आदेश, तब्बल 12 तास..

सोलापूरच्या पंढरपूरमध्ये धक्कादायक घटना घडली. ज्याने एकच खळबळ उडाली. थेट विहिरीचे काम सुरू असताना दगड कोसळल्याने थेट चार कामगार अडकून पडले. या घटनेची संपूर्ण चौकशी पालकमंत्र्यांच्या आदेशाने एक समिती स्थापन करून होणार आहे.

मोठी विहीर दुर्घटना! जिल्हाधिकाऱ्यांचे थेट चाैकशीचे आदेश, तब्बल 12 तास..
Solapur
| Updated on: Nov 16, 2026 | 7:39 AM
Share

पंढरपूरमधील विहीर दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. याबाबतची घोषणा करण्यात आली. शोधकार्यात विहिरीतून बाहेर काढलेल्या दगडाची तपासणी करून ब्लास्टिंगमध्ये कुठले केमिकल वापरले याचाही उलगडा होणार आहे. पंढरपूरमध्ये मोठी दुर्घटना घडली. पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात दगडाचा ढिगारा कोसळून चार कामगार अडकल्याची घटना घडली. विहिरीचे काम सुरू असताना ही घटना घडली. जिल्ह्यातील परवानगी घेतलेल्या व न परवानगी घेतलेल्या विहिरींचे सर्वेक्षण करणार असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली. बारा तासाहून अधिक काळ जिल्हाधिकारी घटनास्थळावर तळ ठोकून बचाव कार्यात सहभागी झाले होते. पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात दगडाचा ढिगारा कोसळून चार कामगार अडकले होते.

या घटनेची संपूर्ण चौकशी पालकमंत्र्यांच्या आदेशाने एक समिती स्थापन करून होणार आहे. या शोधकार्यात विहिरीतून बाहेर काढलेल्या दगडांची तपासणी करून त्यावर असणाऱ्या केमिकलची ही तपासणी होणार असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी थेट याबाबतचे आदेशच दिले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतांमध्ये सुरू असलेल्या व परवानगी घेतलेल्या किंवा न घेतलेल्या विहिरींचे सर्वेक्षण करणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे विहीर दुर्घटनेनंतर सोलापूर जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणावर अलर्ट मोडवर आहे. या प्रकरणाची आता सखोल चाैकशी केली जाणार आहे. संबंधित दोषी व्यक्तींवर कारवाई केली जाईल. विशेष म्हणजे पंढरपूर विहीर दुर्घटनेतील बचाव कार्य आणि शोधकार्यात सोलापूरचे जिल्हाधिकारी स्वतः बारा तासाहून अधिक काळ घटनास्थळावर तळ ठोकून होते.

त्यांनी स्वत: बचावकार्यात सहभाग देखील घेतला. 12 तासानंतर चौघांपैकी पहिल्या कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. दगडाच्या ढीगार्‍याखाली अडकलेला कामगाराला बाहेर काढल्यावर वैद्यकीय तपासणीनंतर मृत घोषित करण्यात आले. सिद्धू घाडगे या कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. NDRF कडून तिघांचा शोध सुरु असल्याची माहिती मिळतंय. विहिरीचे काम सुरू असताना अचानक दगड पडल्याने ही घटना घडली. कामगारांना बाहेर येण्यासही वेळ मिळाला नाही.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी