AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येक गणपती विसर्जन मिरवणुकीत तो तुफान नाचायचा; लक्ष्याचा गिरगावातील हा किस्सा माहीत आहे का?

लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक महान अभिनेते होते. ज्येष्ठ सिने समीक्षक दिलीप ठाकूर यांनी लक्ष्मीकांत बेर्डे हे गणपती विसर्जन मिरवणूक तुफान डान्स करायचे याबाबतची आठवण सांगितली आहे.

प्रत्येक गणपती विसर्जन मिरवणुकीत तो तुफान नाचायचा; लक्ष्याचा गिरगावातील हा किस्सा माहीत आहे का?
Laxmikan Berde
| Updated on: Sep 06, 2025 | 5:33 PM
Share

गिरगावातील खेतवाडी, कुंभारवाडा अशा मराठी संस्कृती, मूल्ये, परंपरा जपलेल्या अथवा वाढलेल्या वस्तीत लक्ष्मीकांत बेर्डे लहानाचा मोठा झाला. खेतवाडीतील युनियन हायस्कूलचा आणि मग गिरगाव चौपाटीवरच्या भवन्स कॉलेजचा तो विद्यार्थी. आणि त्यातच गिरगावात जबरदस्त सण संस्कृती! मकर संक्रांतपासून दत्त जयंतीपर्यंत सगळे लहान मोठे सण गिरगावात साजरे होण्याची परंपरा खूपच जुनी. त्यात प्रत्येक लहान, मोठ्या, चिंचोळ्या, आडव्या गल्लीत सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाची जबरा धूम. आणि प्रत्येक मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक म्हणजे जबरदस्त कच्ची बाजा.

अतिशय धूमधडाक्यात प्रत्येक मिरवणूक निघण्याची परंपरा आजही कायम आहे. अशा सामाजिक, सांस्कृतिक, सणवारी वातावरणात लहानाचा मोठा होत जाताना लक्ष्मीकांत अर्थात आपला लक्ष्या बेर्डे यात मनसोक्त मनमुराद नाचायचाच. प्रत्येक वर्षी त्याचा हा आनंद सोहळा अगदी ठरलेला. तो काय करायचा माहित्येय? तो प्रार्थना समाज ते आॅपेरा हाऊस असा नाचत नाचत जाई आणि मग पुन्हा माघारी येई आणि प्रार्थना समाजला बघायचा की कोणत्या मिरवणूकीत चांगला कच्ची बाजा आहे, त्यातून तो पुन्हा ऑपेरा हाऊसपर्यंत जाई. पुन्हा माघारी येई आणि प्रार्थना समाजला बघायचा की….. एक प्रकारचे हे फ्री लान्स असे आणि त्याचा उत्साह पाहून त्याला कोणी अडवतही नसे.

पाच दिवसाचे, मग सात दिवसाचे आणि मग अनंत चतुर्थीच्या दिवशीचे गणपती अशी त्याला नाचायला मुबलक संधी मिळाली. तोही आनंदला. हे सगळे एन्जाॅय केले. त्याचे तेव्हा शालेय वय असल्याने सगळे कसे जमून गेले. मग गिरगावातील साहित्य संघ मंदिरात तो नाटकात भूमिका मिळण्यासाठी धडपड करु लागला आणि मग त्याने हे नाचणे अर्थात कमी कमी करतच बंद केले. मराठी चित्रपटसृष्टीत तो ‘सुपर स्टार ‘ झाल्यावरही आपले हे जुने दिवस अजिबात विसरला नाही. आपली ही जुनी आठवण तो आवर्जून सांगे आणि अगदी भारावून जाई.

प्रत्येक सेलिब्रेटिजच्या सणासुदीबद्दल आपल्या काही जुन्या आठवणी असतातच, लक्ष्याची आठवण काही वेगळीच होती. तो स्टार झाला, पण आपल्या जुन्या आनंदाला विसरला नाही हे जास्त महत्वाचे आहे. कालांतराने तो अंधेरीत राह्यला आला, त्याच्या घरी गणपती येऊ लागला, पण गप्पांच्या ओघात तो गिरगावातील विसर्जन मिरवणूकीची आठवण काढे. तेच तर महत्वाचे आहे…

दिलीप ठाकूर ( लेखक ज्येष्ठ सिने समीक्षक आहेत)

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना