AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात खळबळ! अरबी समुद्रात अमेरिका-इराण भिडले, कोणत्याही क्षणी युद्ध पेटणार

अरबी समुद्रात अमेरिकेच्या विमानवाहू नौका USS अब्राहम लिंकनकडे झेपावणारे इराणचे शाहेद-139 ड्रोन अमेरिकेच्या लढाऊ फायटर F-35 जेटने पाडल्याने तणावात वाढ झाली आहे.

जगात खळबळ! अरबी समुद्रात अमेरिका-इराण भिडले, कोणत्याही क्षणी युद्ध पेटणार
Iran-US Tension
| Updated on: Feb 04, 2026 | 12:25 AM
Share

मेरिकेने मंगळवारी अरबी समुद्रात इराणचे एक ड्रोन पाडल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकन वॉरशिप USS अब्राहम लिंकनकडे हे ड्रोन जात असताना त्याला अमेरिकन सैनिकांनी पाहिले. त्यानंतर अमेरिकेचे F-35 लढाऊ विमानाने झेप घेत या ड्रोनला हवेत नष्ट केले. ही घटना अशा वेळी घडली आहे ज्यावेळी अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढला आहे. अमेरिकेने मध्य पूर्वेत आपल्या सैन्याची जमावजमव वाढवली आहे.त्यामुळे आता इराण कोणते पाऊल उचलते याकडे लक्ष लागले आहे.

अमेरिकन नौदलाने एअरक्राफ्ट कॅरियर स्टाईक ग्रुप USS अब्राहम लिंकन आणि अनेक गायडेड मिसाईल डेस्ट्रॉयर या भागात तैनात केली आहे. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्या संदर्भात अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे इराणने कठोर भूमिका घेतली आहे. इराणने इशारा देत जर अमेरिकेने हल्ला केला तर तो संपूर्ण मध्य पूर्वेत अमेरिकन ठिकाणांना आणि इस्राईलला टार्गेट करु शकतो.

अमेरिकेने दिला होता इशारा

३० जानेवारीला इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन दिवसांचा नौदलाचा सराव करण्याची घोषणा केली होती. दुसऱ्या दिवशी, यूएस सेंट्रल कमांड (CENTCOM) ने इराणच्या IRGC ला समुद्रात तणाव वाढवू शकणाऱ्या मोहिमामध्ये सहभागी होण्यापासून दूर रहाण्याचे निर्देश दिले. इराणने हे सराव सुरक्षितपणे आणि आंतरराष्ट्रीय जहाजांना धोका न पोहचवता करावेत असा सल्ला अमेरिकेने दिला होता. होर्मुझची सामुद्रधुनी हा एक महत्त्वाचा सागरी मार्ग आहे, ज्यामधून दररोज सुमारे १०० व्यापारी जहाजे मार्गक्रमण करतात. जगाच्या सुमारे २०% तेल पुरवठा या मार्गातून होत असतो.

इराणला आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र आणि हवाई क्षेत्रात काम करण्याचा अधिकार आहे, परंतु अमेरिकन सैन्य किंवा व्यापारी जहाजांजवळील कोणतीही कृती संघर्ष आणि तणाव वाढवू शकतात असा इशारा अमेरिकेने दिला होता. आम्ही आपल्या सैन्याचे, जहाजांचे आणि विमानांचे संरक्षण करणार असेही अमेरिकेने म्हटले होते.अमेरिकन जहाजांजवळील कोणतेही सशस्त्र उड्डाणे, हाय-स्पीड बोटी किंवा शस्त्रे अमेरिका सहन करणार नाही असेही अमेरिकेने म्हटले होते.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडमध्ये २१ देश

CENTCOM अर्थात अमेरिकन सेंट्रल कमांडमध्ये मध्य पूर्व, दक्षिण आशिया आणि मध्य आशियातील अनेक भाग आहेत. त्यात इजिप्त, इराण, इस्रायल आणि पाकिस्तान सारखे देश समाविष्ट आहेत. या प्रदेशात होर्मुझची सामुद्रधुनी, सुएझ कालवा आणि बाब अल-मंडेब सारखे महत्त्वाचे सागरी मार्ग देखील समाविष्ट आहेत.

या प्रदेशात तणाव वाढला

अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका यूएसएस अब्राहम लिंकन देखील २६ जानेवारी रोजी सेंट्रल कमांड क्षेत्रात आली. सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेने त्याच्या सरावाची कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. दोन्ही देश त्यांची लष्करी ताकद दाखवत आहेत आणि पर्शियन आखातात एकमेकांना इशारा देत आहेत. अमेरिका आणि इराणच्या लष्करी कारवायांमुळे या प्रदेशात तणाव वाढला आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी