Pratap Sarnaik | ठाणे शिवसेनेचाच बालेकिल्ला आजच्या निकालाने… प्रताप सरनाईक यांनी विरोधकांना डिवचले
आज ठाणे महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शर्मिला गायकवाड यांची महापौरपदी निवड झाली आहे, तर उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांची निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आज ठाणे महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शर्मिला गायकवाड यांची महापौरपदी निवड झाली आहे, तर उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांची निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्रात शिवसेना-भाजप युती आहे. तसेच राज्यातही शिवसेना-भाजप युती आहे आणि आता ठाणे महापालिकेतही ही आघाडी टिकून राहिली आहे. कोणी कितीही वल्गना केल्या तरी ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असा टोला प्रताप सरनाईक यांनी लगावला आहे.
Published on: Feb 03, 2026 02:14 PM
Follow Us
Latest Videos
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?

