AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satara Crime News: शिक्षकाने मुलीला वर्गाबाहेर बोलवलं अन्… व्हॅलेंटाईन डेला धक्कादायक प्रकार, सातारा हादरलं!

Satara Crime News: एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात थेट शिक्षकाने शाळेत शिकणाऱ्या एका मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. आता नेमकं काय घडलं जाणून घेऊया...

Satara Crime News: शिक्षकाने मुलीला वर्गाबाहेर बोलवलं अन्... व्हॅलेंटाईन डेला धक्कादायक प्रकार, सातारा हादरलं!
karad caseImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 16, 2026 | 1:12 PM
Share

अनेक पालक आपल्या मुलांना विश्वासाने शाळेत किंवा कॉलेजला पाठवतात. त्यांचा तेथील संस्थेवर, शिक्षकांवर पूर्ण विश्वास असतो. पण याच विश्वासाला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मलकापूर शहरात ही घटना घडली आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला तिच्या शाळेतीलच एका शिक्षकाने ‘व्हॅलेंटाईन डे’ (१४ फेब्रुवारी) रोजी प्रपोज करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?

14 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास शिक्षकाने पीडित मुलीला वर्गाबाहेर बोलावले. मुलीला भीती वाटल्याने तिने तीन मैत्रिणींना सोबत घेतले. मात्र, शिक्षकाने इतर तिघींना वर्गात परत पाठवले आणि पीडित मुलीला थांबवले. त्याने मुलीला सांगितले, “मी तुला चार दिवस बोलावत होतो, तू का आली नाहीस? रात्री तीन वाजता व्हॉट्सॲपवर ऑनलाइन का असतेस? मी तुझ्यावर प्रेम करतो.” असं म्हणत शिक्षकाने तिचा हात पकडल्याचा आरोप करण्यात आला आहे. घाबरलेल्या मुलीने हात झटकून वर्गात धाव घेतली. नंतर तिने ही घटना आपल्या मैत्रिणी आणि कुटुंबीयांना सांगितली. कुटुंबीयांनी तात्काळ कराड शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. रविवारी पीडित मुलीच्या तक्रारीवरून संबंधित शिक्षकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधील आणखी एक गंभीर घटना

दुसरीकडे, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्येही एक धक्कादायक प्रकार घडला आहे. महालक्ष्मी नगर परिसरातील एका खासगी रुग्णालयात सहा वर्षीय मुलावर चुकीचे उपचार झाले. नंतर सायन रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आरोपी ठरलेल्या महिला डॉक्टरने आठवडाभरापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या तिच्यावर उल्हासनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि तिची प्रकृती स्थिर आहे.

मृत मुलाच्या नातेवाईकांनी डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता. यानंतर काही सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी तक्रारी केल्या, तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे तणाव वाढल्याने मानसिक दबावाखाली तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे डॉक्टरने सांगितले आहे.

आम्ही उठाव केला नसता तर मंत्रीपद मिळालं नसतं; शिंदेंचा नाईकांना इशारा
आम्ही उठाव केला नसता तर मंत्रीपद मिळालं नसतं; शिंदेंचा नाईकांना इशारा.
अजितदादांच्या निधानानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना भविष्याची चिंता?
अजितदादांच्या निधानानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना भविष्याची चिंता?.
विलीनीकरणावरून पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेत?
विलीनीकरणावरून पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेत?.
संदीप देशपांडे यांची नाव न घेता संजय राऊतांवर टीका
संदीप देशपांडे यांची नाव न घेता संजय राऊतांवर टीका.
किशोरी पेडणेकर यांची आज विरोधी पक्षनेतेपदी घोषणा होणार
किशोरी पेडणेकर यांची आज विरोधी पक्षनेतेपदी घोषणा होणार.
टिपू सुलतान प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले; भाजपच्या आंदोलनानंतर....
टिपू सुलतान प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले; भाजपच्या आंदोलनानंतर.....
चोरट्यांचा एकाच वेळी 5 न्यायाधीश, 4 कोर्ट कर्मचाऱ्यांच्या घरात डल्ला
चोरट्यांचा एकाच वेळी 5 न्यायाधीश, 4 कोर्ट कर्मचाऱ्यांच्या घरात डल्ला.
टिपूच्या नावाने भाजपच्या टिपऱ्या; सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय?
टिपूच्या नावाने भाजपच्या टिपऱ्या; सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय?.
जनतेच्या प्रश्नांवर भाजपने कधी आंदोलन केले का? – संजय राऊतांचा सवाल
जनतेच्या प्रश्नांवर भाजपने कधी आंदोलन केले का? – संजय राऊतांचा सवाल.
पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मारण्याची धमकी! करुणा शर्मांचा आरोप
पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मारण्याची धमकी! करुणा शर्मांचा आरोप.