AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चोरट्यांचा एकाच वेळी 5 न्यायाधीश, 4 कोर्ट कर्मचाऱ्यांच्या घरात डल्ला

चोरट्यांचा एकाच वेळी 5 न्यायाधीश, 4 कोर्ट कर्मचाऱ्यांच्या घरात डल्ला

| Updated on: Feb 16, 2026 | 11:25 AM
Share

अमरावतीमध्ये देशाच्या इतिहासातील बहुदा पहिलीच अनोखी चोरी घडली आहे. एकाच वेळी तब्बल पाच न्यायाधीश आणि चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरांमध्ये डल्ला मारण्यात आला. विशेष म्हणजे मुख्य गेटवर पोलीस बंदोबस्त असतानाही चोरट्यांनी मागच्या बाजूने प्रवेश करत लाखोंचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे शहराच्या कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अमरावतीमध्ये एकाच वेळी पाच न्यायाधीश आणि चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरांमध्ये चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस बंदोबस्त असतानाही चोरट्यांनी ही धाडसी चोरी केल्याने कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ही घटना अमरावती शहरातील नळदमयंती आणि शाहनूर अपार्टमेंटमध्ये घडली. अपार्टमेंटच्या मुख्य गेटवर पोलीस तैनात असतानाही चोरट्यांनी मागच्या भिंतीवरून प्रवेश करत डल्ला मारला. पाचही न्यायाधीश बाहेरगावी असल्याने चोरट्यांनी संधी साधली. मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास ही घरफोडी झाली, ज्यात लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आला. पुढील तपासाची कारवाई सुरू आहे.

दोन दिवसांपूर्वीच अमरावतीत एका सुवर्णकाराला लुटल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर न्यायाधीशांच्या घरी झालेल्या चोरीने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर टीका होत आहे. न्याय देणाऱ्या न्यायाधीशांची घरेच सुरक्षित नसतील, तर सामान्यांचे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Published on: Feb 16, 2026 11:25 AM