AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्राची बॉस होती, निशिका आणि पाखी तर… अचानक तीन बहिणींनी आयुष्य संपवलं; त्या घटनेनंतर वडिलांचा धक्कादायक खुलासा काय?

गाझियाबादमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. जी ऐकून तुम्ही देखील मुलांना फोन देणं बंद कराल.

प्राची बॉस होती, निशिका आणि पाखी तर... अचानक तीन बहिणींनी आयुष्य संपवलं; त्या घटनेनंतर वडिलांचा धक्कादायक खुलासा काय?
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 04, 2026 | 3:36 PM
Share

Crime News : दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहरात माणुसकी हादरवून टाकणारी घटना घडली. भारत सिटी सोसायटीतील बी-1 टॉवरच्या फ्लॅट क्रमांक 907 मधून काहीतरी खाली पडल्याचा मोठा आवाज झाला. आवाज ऐकताच सोसायटीतील नागरिक धावत घटनास्थळी पोहोचले. तेथे दिसलेलं दृश्य पाहून सर्वजण सुन्न झाले.

इमारतीखाली तीन अल्पवयीन मुली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या दृश्याने त्यांच्या आई-वडिलांनाही मोठा धक्का बसला. प्राथमिक तपासात हा प्रकार आत्महत्येचा असल्याचे स्पष्ट झाले. तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिन्ही मुलींचे मृतदेह ताब्यात घेतले व पोस्टमार्टमसाठी पाठवले. मृत मुलींची नावे निशिका (16), प्राची (14) आणि पाखी (12) अशी आहेत. तिन्ही सख्ख्या बहिणी होत्या.

रात्री घडलेला थरकाप उडवणारा प्रकार

मुलींचे वडील चेतन यांनी पोलिस चौकशीत धक्कादायक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, तिन्ही मुलींना मोबाइलवरील ऑनलाइन गेम्सचे तीव्र व्यसन लागले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी मुलींच्या मोबाईल वापरावर कुटुंबीयांनी बंदी घातली होती. यामुळे त्या मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाल्या होत्या. गेल्या दोन वर्षांपासून तिन्ही मुली शाळेत जात नव्हत्या. अभ्यासातही त्या कमकुवत होत्या. परीक्षा नापास झाल्यानंतर त्यांनी शाळाच सोडली होती. तिन्ही मुलींवर कोरियन संस्कृतीचा आणि कोरियन ऑनलाइन गेम्सचा प्रचंड प्रभाव होता. त्या सतत कोरियाला जायचं स्वप्न पाहत होत्या. चेतन म्हणाले, ‘त्या सतत कोरियाला जायचं म्हणायच्या. पण मी विचारायचो, तिथे जाऊन आपण काय करणार?’

घटनेच्या रात्री घरातील सर्वजण झोपले होते. मुलींनी आई-वडिलांचे मोबाईल फोन घेतले आणि स्वतःच्या खोलीत बंद केलं. रात्री 2 वाजता बाल्कनीतून काहीतरी पडल्याचा आवाज आला. चेतन यांनी मुलींच्या खोलीकडे धाव घेतली, मात्र दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर कळले की तिन्ही बहिणींनी नवव्या मजल्यावरून खाली उडी घेतली होती.

‘बॉस’ होती प्राची, बहिणी करत होत्या फॉलो

चेतन यांनी सांगितले की, प्राची स्वतःला ‘बॉस’ म्हणायची आणि निशिका व पाखी तिचे आदेश पाळायच्या. तिन्ही मुली कायम एकत्र असायच्या. एकत्र जेवण, एकत्र टॉयलेट, एकत्र झोप. फोनशिवाय त्या जेवतही नव्हत्या. मोबाईल गेम्स त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनले होते.

पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट आणि एक डायरी सापडली. सुसाईड नोटमध्ये लिहिले होते, ‘True Life Story. खाली रडणाऱ्या चेहऱ्याचं चित्र काढून त्याखाली लिहिले होते I’m Really Sorry Papa. डायरीत We Love Korean Games असे लिहिले होते. खोलीच्या भिंतींवरही भावनिक वाक्ये लिहिलेली आढळली. Make me a heart of broken, I am very alone.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा