रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून ‘सिंदुर’ महारक्तदान शिबीराचे आयोजन
शिवसेनेतर्फे दिल्लीतील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेनेतर्फे दिल्लीतील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक शिवसैनिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. खासदार श्रीकांत शिंदे यांनीही या उपक्रमात सहभागी होत रक्तदान केले. यावेळी तब्बल १२०० शिवसैनिक रक्तदान करतील अशी माहिती समोर आली होती.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी रक्तदान शिबिरामागील उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले की, हे रक्तदान शिबिर सीमेवरील जवानांच्या कामाला आणि त्यांच्या निष्ठेला समर्पित आहे. देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या योगदानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
भारताने अलीकडेच पाकिस्तानला नमवल्याचा उल्लेखही एकनाथ शिंदे यांनी केला. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्याला भारताने मिशन सिंदूरच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले होते, असे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर जवानांच्या त्यागाची आणि कर्तव्यनिष्ठेची आठवण ठेवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. दिल्लीतील या रक्तदान शिबिराला शिवसैनिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
Published on: Aug 09, 2026 04:44 PM
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास

