AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?

मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची… नेमकी भानगड काय?

| Updated on: Aug 09, 2026 | 5:09 PM
Share

पुण्यातील विमाननगर परिसरात नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या पबवर पोलिसांनी कारवाई केली आहे. विमानतळाजवळील एअरमॉलमध्ये असलेल्या ‘द हौज कम्युन’ पबवर गुन्हे शाखेने पहाटेच्या सुमारास छापा टाकला. पबमध्ये नियमांचे उल्लंघन करून पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

पुण्यातील विमाननगर परिसरातील एअरमॉलमध्ये द हौज कम्युन नावाचा पब आहे. हा पब रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनंतर पबमध्ये जाऊन तपासणी केली.

पहाटे 3 वाजेपर्यंत पब सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले. नियमांनुसार निर्धारित वेळेनंतरही पब सुरू ठेवल्याने पोलिसांनी संबंधित ठिकाणी कारवाई केली. या कारवाईदरम्यान पबमध्ये पार्टीसाठी उपस्थित असलेल्या 62 जणांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. तसेच पबमध्ये नियमांचे पालन होत होते का, याचीही पोलिसांनी तपासणी केली.

विमानतळाजवळील परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पबवर झालेल्या या कारवाईमुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पबविरोधात पुढील कारवाई काय होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Published on: Aug 09, 2026 05:09 PM

Follow Us