AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांचे खासदार पीएम मोदींना भेटणार,हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रीया, नेमके काय म्हणाले…

आदिवासी हा संपूर्ण जगाचा मूलनिवासी आहे. या आदिवासीला वनवासी ठरवण्याचं एक पाप, एक राजकीय षडयंत्र आपल्या देशात सुरू आहे. जल, जंगल, जमीन ही लढाई अधिक तीव्रतेने लढण्याची आवश्यकता आहे. जल, जंगल, जमिनीवर पुंजीपंथींना मोठा ताबा मिळत आहे. शहरीकरणाच्या नावाखाली आदिवासींच्या अधिकाराची फार मोठ्या प्रमाणावर अवहेलना होत असल्याचेही काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

शरद पवारांचे खासदार पीएम मोदींना भेटणार,हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रीया, नेमके काय म्हणाले...
Harshvardhan Sapkal
| Updated on: Aug 09, 2026 | 11:24 PM
Share

शरद पवार यांचे खासदार उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीविषयी राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क केले जात आहे. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी शरद पवार यांचे खासदार मोदींना भेटून काय दिवे लावणार आहेत अशा बोचरा सवाल केला आहे. याबाबत आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची देखील प्रतिक्रीया आली आहे.

पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात. त्यांनी सर्वांनाच भेटले पाहिजे. मात्र, जे पंतप्रधान संसदेतच येत नाहीत, त्यांच्याकडून अशी अपेक्षा करणं चुकीचे आहे. प्रंतप्रधानांना भेटण्यासाठी एखादे मंडळ जात असेल तर त्यात वावगं असे काही नाही अशी प्रतिक्रीया काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. त्यांनी यावेळी डेलीमिटेशन हा भाजपाचा कावा असल्याचेही म्हटले आहे. डीलीमिटेशन हे राष्ट्रविरोधी आहे, देश विरोधी आहे,संविधान विरोधी आहे. त्याला सर्वांनी मिळून विरोध केला पाहिजे. कोणाला जर भेटायचं असेल तर तर जाणाऱ्यांची आणि भेटणाऱ्यांची दोघांची मर्जी आहे असेही सपकाळ यांनी म्हटले आहे.

त्याला भारतीय जनता पार्टी जबाबदार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी एका विमानातून प्रवास केला आहे. याबद्दल विचारले असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी राजकीय दृष्टिकोनातून आणि समाज स्वास्थांच्या दृष्टिकोनातून हे योग्य नाही. एकाच विमानात प्रवास करणं, एकाच व्यासपीठावर बसणं, एकाच बसने जाणं अशी आपली एक परंपरा आणि संस्कृती राहिलेली आहे. भाजपने पैसे आणि सत्तेच्या माध्यमातून गुंडागर्दीच्या माध्यमातून या आपल्या जुन्या आणि सभ्यपणाला कुठेतरी गालबोट लावलेलं आहे. त्यामुळे असे प्रवास करणं काही चुकीचं जरी नसले तरी मात्र प्रवास झाल्यानंतर त्यावर लगेच शंका उपस्थित केल्या जातात. त्याला भारतीय जनता पार्टी जबाबदार असल्याचेही सपकाळ यांनी म्हटले आहे.

इच्छाशक्ती असेल तर आरक्षणाचा प्रश्न सोडवावा

मनोज जरांगे पाटील तीन वेळेस मुंबईला गेले. त्यांना काय काय आश्वासन दिली गेली होती ? हे एकदा सरकारने जाहीर करावं. पूर्वी काँग्रेसने मराठा समाजाला जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षण पूर्ववत करण्यासाठी सरकार का उदासीन आहे ? याचे उत्तरही त्यांनी द्यावे. जर केंद्र आणि राज्य सरकारला खरंच आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल. तर त्यांनी आपल्या देशाची जनगणनांना सुरू आहे, त्यामध्ये जातनिहाय जन गणनेचा कॉलम टाकावा. सरकारमध्ये इच्छाशक्ती असेल तर त्यांनी हा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत